लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडताच आता विविध एक्झिट पोलचे अंदाज पुढे येऊ लागले आहेत. त्यानुसार दिल्लीतील निकालाचे अंदाजदेखील समोर आले आहेत. दिल्लीत भाजपाला ६ ते ७ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज माय एक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोटलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत इंडिया आघाडीला अरविंद केजरीवाल फॅक्टरचा म्हणावा तसा फायदा झाला नसल्याची चर्चा सध्या राजकीय सुरू झाली आहे.

हेही वाचा – Exit Poll : केरळ, तमिळनाडूत भाजपाचा चंचूप्रवेश तर कर्नाटकात काँग्रेसला धक्का?…

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Chhagan Bhujbal on Rajdeep Sardesai book
Chhagan Bhujbal: ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपाशी हातमिळवणी’, पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले…

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीत भाजपाला ६ ते ७ जागात, तर इंडिया आघाडीला १ जागेवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलमध्ये आपचा सुपडा साफ झाला असून आपला एकही जागा मिळणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. मतांच्या टक्केवारीबाबत बोलायचं झाल्यास दिल्लीत भाजपाला ५४ टक्के, काँग्रेस १९ टक्के, आपला २५ टक्के टक्के मते मिळणार असल्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये दिल्लीत भाजपा सर्व सातही जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि आपला एकही जागा मिळणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे.

दिल्लीतील एकूण सात जागांपैकी भाजपाने सातही जागांवर निवडणूक लढवली होती. तर इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसने ३ तर आम आदमी पक्षाने ४ जागांवर निवडणूक लढवली होती.

महत्त्वाचे म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यधोरण घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्याचा फटका इंडिया आघाडीला बसणार असे सांगण्यात येत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने प्रचार करण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केल्या त्यांनी तिसऱ्या टप्प्यानंतर प्रचारात सहभाग घेतला होता.

हेही वाचा – Exit Poll 2024 : तिरुवनंतपूरमधून शशी थरूर यांचा पराभव होणार? एक्झिट पोलचा अंदाज काय स…

दरम्यान, आता एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या प्रचाराचा म्हणावा तसा फायदा इंडिया आघाडी झाला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.