मेरा पानी उतरता देख
मेरे किनारेपर घर मत बसा लेना..
मै समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा!

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस २०१९ ला मावळते मुख्यमंत्री असताना हे म्हणाले होते. राजकीय भाषणांमध्ये शेरोशायरी असणं ही काही नवी बाब नाही. मात्र देवेंद्र फडणवीस होणंही सोपं नाहीये. त्याला कारणंही तशीच आहेत. देवेंद्र फडणवीस २०१४ ला मुख्यमंत्री झाले तेव्हापासून २०२४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षांचा आहे. मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह कसा भेदायचा ते माहीत आहे. असं देवेंद्र फडणवीस काही मुलाखतींमध्ये म्हणाले होते. त्या मुलाखतींची आठवण नक्कीच होते आहे कारण महाराष्ट्राला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधारराव फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे मुख्यमंत्री म्हणून लाभणार असे संकेत आहेत.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

२०१४ ला काय घडलं?

२०१४ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढली गेली होती. त्यावेळी भाजपाचे १२२ आमदार निवडून आले. याचं बरचंसं श्रेय गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांना गेलं. गोपीनाथ मुंडे यांचं प्लॅनिंग आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) केलेली अंमलबजावणी यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने १०० आमदारांची संख्या ओलांडली. ही घटना राजकीय इतिहासात नोंद करुन ठेवण्यासारखीच म्हणावी लागेल. कारण देवेंद्र फडणवीसांच्या नावे आणखी एक विक्रम झाला आहे. तो म्हणजे सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपा आमदारांची संख्या १०० च्या पुढे नेण्याचा.

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री जाहीर करण्याआधी एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार ही भाजपातली बडी नावं चर्चेत होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे नाव जाहीर झालं आणि त्यांनी सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दाखवला. हा कार्यकाळ पूर्ण करुन दाखवणारेही ते अलिकडच्या काळातले ते एकमेव नेते आहेत. शरद पवार यांच्याकडे तीनवेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद आलं होतं मात्र सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होणं त्यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्यालाही जमलं नाही. २०१४ मध्ये सुरुवातीला राष्ट्रवादीने बाहेरुन दिलेल्या पाठिंब्यावर आणि त्यानंतर मग शिवसेनेबरोबर देवेंद्र फडणवीस सत्तेत राहिले. उत्तम प्रशासकीय कारभार कसा करतात ते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दाखवून दिलं. मेट्रोचं स्वप्न, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार योजना या आणि अशा अनेक योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. यानंतर उजाडलं ते २०१९ चं वर्ष. या वर्षात भाजपाने शिवसेनेशी हातमिळवणी करत महायुती म्हणून निवडणूक लढवली.

Devendra Fadnavis News
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं भाजपाच्या सूत्रांनी म्हटलं आहे. (फोटो-देवेंद्र फडणवीस,फेसबुक पेज)

२०१९ मध्ये काय घडलं?

२०१९ ला महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला लोकांनी कौल दिला. महायुतीला १६१ जागा मिळाल्या. त्यात भाजपाने १०५ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन आग्रह सुरु केला. त्यांनी हे करण्यामागचं कारण काय होतं? ते असं का वागले? सत्ता आलेली असताना विरोधकांसह म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीसह हातमिळवणी का केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळालीच. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर झालेला तो पहिला राजकीय घाव होता. त्यांनी तो सहन केला. त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरु असतानाच उजाडली २३ नोव्हेंबर २०१९ ही तारीख.

२३ नोव्हेंबर २०१९ पहाटेचा शपथविधी

२३ नोव्हेंबर २०१९ ला पहाटेचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. हे असं का केलं? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. मात्र त्या प्रश्नाचाही कालांतराने उलगडा झाला. अर्थात हे सरकार फक्त ७२ तास चाललं कारण अजित पवारांसह आलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे गेले आणि देवेंद्र फडणवीस यांना दुसरा विश्वासघात सहन करावा लागला तो शरद पवारांकडून. कारण या सगळ्याची कल्पना शरद पवारांना होती. शिवसेनेबरोबर जायला काँग्रेस नाही म्हणेल याची त्यांना खात्री होती. त्यामुळे सत्तेत जाण्यासाठी त्यांनी भाजपासह बोलणी सुरु ठेवली होती. शपथविधी, मंत्रिपदं सगळ्याचं वाटपही ठरलं होतं. पण शरद पवारांना जेव्हा समजलं की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकत आहेत तेव्हा त्यांनी भाजपाला हात दाखवला. हा राजकीय घावही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पचवला.

सर्वाधिक आमदार असूनही विरोधात बसायची वेळ

सर्वाधिक आमदार निवडणून आणले तरीही देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्ये विरोधात बसायची वेळ आली. तसंच करोनाचं संकटही देशासह जगावर आलं. त्यानंतर फेसबुक लाईव्हवरुन चालणारा उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा कारभार महाराष्ट्राने पाहिला. या अडीच वर्षांच्या कालावधीत जी काही मोजकी अधिवेशनं झाली ती अधिवेशनं विरोधी पक्षनेता म्हणून गाजवली ती देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी. संजय राठोड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तिघांची जी प्रकरणं देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढली त्यामुळे महाविकास आघाडीची पुरती नाचक्की झाली. सर्वात जास्त गाजलं ते अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दिलेल्या दरमहा १०० कोटींच्या खंडणीचं प्रकरण. यानंतर अनिल देशमुखांना तुरुंगातही जावं लागलं.

पुन्हा येईनवरुन यथेच्छ टीका

या अडीच वर्षांच्या कालावधीत जेव्हा देवेंद्र फडणवीस सभागृहात यायचे तेव्हा त्यांना पुन्हा येईन वरुन कायम हिणवलं जायचं. २०१९ च्या प्रचारात त्यांनी हा नारा घेतला होता. या घोषणेचे मीम तयार झाले, विरोधकांनी हिणवलं. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही वाट्टेल ते बोललं गेलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ते राजकीय वारही पचवले. एवढंच काय महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणत त्यांना डिवचलंही होतं. संजय राऊत, सुषमा अंधारे हे शिवसेनेचे नेते टीका करत होतेच. तसंच उद्धव ठाकरेही त्यांच्या विरोधात गेले त्यामुळे तेदेखील अपमान करत होते. हे सगळे अपमान देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पचवले.

२०२२ मधला राजकीय भूकंप

२१ जून २०२२ ही तारीख महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. कारण एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेऊन बंड केलं. यानंतर पुढचे नऊ दिवस अनेक घडामोडी घडल्या आणि २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. महाविकास आघाडी सरकार अशा पद्धतीने पडेल याची कल्पना दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंनाही नव्हती. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांची नाराजी प्रचंड वाढली होती. या नाराजीनंतर जेव्हा एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांशी ( Devendra Fadnavis ) संपर्क साधला तेव्हा त्यांना बळ देण्याचं काम भाजपाने केलं. ३० जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

उपमुख्यमंत्री झाल्याने टीका

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले म्हणूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली. तसंच त्यांना हिणवण्यात आलं. अगदी शरद पवारांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पडला होता अशी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनाही सत्तेत यायचं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी त्यांना फडतूस आणि कलंक असंही म्हणून घेतलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाने दिलेला आदेश आणि जबाबदारीसमर्थपणे सांभाळून दाखवली. अडीच वर्षांचं उपमुख्यमंत्रिपद त्यांच्या वाट्याला आलं. त्यानंतर वर्षभरातच या पदाचेही दोन वाटे झाले.

२०२३ ला अजित पवारांना बरोबर घेतलं

यानंतर महाराष्ट्र आणखी एका राजकीय भूकंपाला सामोरा गेला. हा भूकंप होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनी ४१ आमदारांसह महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांची साथ दुसऱ्यांदा सोडून ४१ आमदारांना बरोबर आणणं हे अजित पवारांसाठीही सोपं नव्हतं. पण त्यांना बरोबर घेत महायुतीची ताकद आणखी वाढवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने केलं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा महायुतीचा पॅटर्न महाराष्ट्राने २०२३ नंतर पाहिला. लोकसभा निवडणुकीच्या आधी महायुतीचं बळ इतकं वाढलं होतं की सगळ्यांना वाटलं होतं की लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी चांगली असेल.

Devendra Fadnavis News
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने सलग तिसऱ्यांदा घवघवीत यश मिळवलं आहे. (फोटो-देवेंद्र फडणवीस, फेसबुक पेज)

२०२४ ची लोकसभा निवडणूक, देवेंद्र फडणवीस यांचे अश्रू आणि…

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसला. कारण महाविकास आघाडीने संविधान बदलणार, मुस्लीम आणि दलितांना ४०० पार सरकार गेलं तर धोका आहे असा प्रचार केला होता, या प्रचारामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला मोठं अपयश आलं. कारण महायुतीचे फक्त १७ खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. भाजपाच्या २२ खासदारांची संख्या थेट ९ वर आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारीही दाखवली. मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) जोमाने कामाला लागले. मतांसाठी धर्मयुद्धाची हाक दिली. ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दिसला.

समंदर लौटकर आ गया

समंदर हूँ लौटकर जरुर आऊंगा हे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचे शब्द महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खरे ठरले. १३२ जागांवर भाजपाचे आमदार विजयी झाले. तर महायुतीला २३९ जागांवर प्रचंड यश मिळालं. महाविकास आघाडीचा सूपडा साफ झाला. या निवडणुकीच्या प्रचाराचे पाच महिने होते त्यात देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने टार्गेट करण्यात आलं. मनोज जरांगे यांनीही मराठा आरक्षण न देण्यासाठी फडणवीस ( Devendra Fadnavis ) कसे जबाबदार आहेत हे सातत्याने सांगितलं अगदी त्यांना शिवीगाळही केली. नंतर माफीही मागितली. पण प्रत्येकाच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस होते. एक तर तू राहशील किंवा मी राहिन हे उद्धव ठाकरेंचं वाक्य देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून होतं. संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना खलनायक, महाराष्ट्राचे अनाजीपंत, महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स आणणारे नेते, महाराष्ट्राचा कलंक असं म्हणत राहिले. हू इज देवेंद्र फडणवीस असा सवाल सुषमा अंधारेंनी केला. तर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलं. नाना पटोले तर फडणवीसांविरोधात काय हवं ते बोलत होतेच. सगळ्यांनी टार्गेट करुनही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याऐवजी विकासकामं आणि जनतेशी संवाद सुरु ठेवला. प्रचाराची भाषणं करताना ९५ टक्के विकास आणि पाच टक्के आरोपांना उत्तर असं सूत्र ठेवलं. परिणाम समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस नावाचा अभिमन्यू सगळे चक्रव्यूह भेदून बाहेर आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून ते जेव्हा पुन्हा आलेत तेव्हा अनेकांची बोलती बंद करुन आणि गपगार करुन आलेत यात शंकाच नाही.