Devendra Fadnavis : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे हे चित्र एकदम स्पष्ट झालं आहे. कारण महायुतीने २३६ जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी ही आत्तापर्यंतची अभूतपूर्व कामगिरी आहे यात शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महायुतीच्या कामगिरीचं कौतुक केलं. विजयानंतर महायुतीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेनंतर एक खास किस्सा घडला ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मानले महाराष्ट्राचे आभार
महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातल्या मतदारांमुळे आणि लाडक्या बहिणींमुळे आम्ही जिंकलो आहोत. महाराष्ट्रात अभूतपूर्व निकाल लागला असा निकाल मी मागच्या तीस वर्षांत पाहिलेला नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनीही आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे असं म्हटलं आहे. महायुतीची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर घडलेला किस्सा चर्चेत आला आहे.
पत्रकार परिषदेनंतर नेमकं काय घडलं?
महायुतीची पत्रकार परिषद संपल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि अजित पवार हे तिन्ही नेते उठले. तितक्यात देवेंद्र फडणवीस यांना शिवाजी पाटील यांचा विजय झाल्याची बातमी समजली. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एकनाथ शिंदेंशी मिश्किल संवाद साधला आणि मग अजित पवार यांनीही एक महत्त्वाचं विधान केलं. काय संवाद होता वाचा
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा संवाद काय?
देवेंद्र फडणवीस : “अहो अजून एक आमदार आला आहे निवडून” (हसून कपाळावर हात मारतात)
एकनाथ शिंदे : “अरे काय सांगता आहात ?”
देवेंद्र फडणवीस : “हो, हो शिवाजी पाटील जिंकले आहेत.” (दोघेही हसतात)
अजित पवार : “अरे काय तुम्ही दोघं हसताय, माझा माणूस पडला ना तिकडे” (तिघेही मिश्किलपणे हसतात)
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
असा संवाद तिघांमध्ये रंगला होता. या तिघांचा हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खरंतर हा तिघांमधला खासगी संवाद होता. मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर हा संवाद कॅमेरात कैद झाला. ज्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. राज्यात महायुतीला भरभरुन मतं मिळाली आहेत. आता मुख्यमंत्रिपदी विराजमान कोण होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. @IDiguTipinis या अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.