Devendra Fadnavis राज्याचे माजी गृहंमत्री आणि राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. काटोल मतदारसंघासोबत नागपूर व राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाच्या काही दिवसाआधी असा हल्ला होणे याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस क्षाचे राष्ट्री अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला. यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अनिल देशमुख हे सलीम जावेदप्रमाणे चित्रपटांच्या स्टोऱ्या सांगत आहेत असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं?

काटोल मतदार संघात अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) यांचा मुलगा सलील देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून आल्या.

हे पण वाचा- Anil Deshmukh Attacked : दगड मारा किंवा गोळ्या घाला, मी मरणार नाही… रुग्णालयातून बाहेर पडताच अनिल देशमुखांचा….

अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया काय?

अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळताच त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “माझ्यावर दगड मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही. मी सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.” आता या घटनेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुखांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“अनिल देशमुखांनी सातत्याने हिंदी चित्रपटांमध्ये जशा सलीम-जावेद यांच्या स्टोऱ्या जशा प्रसिद्ध होत्या तशा स्टोऱ्याच सांगितल्या आहेत. अनिल देशमुख यांनी तसंच पुस्तक काढलं. आता असाच हल्ला झाल्याचं ते दाखवत आहेत. पोलीस आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी चित्र स्पष्ट केलं आहे. दहा किलोंचा गोटा विंड शिल्डवर मारला तर ती तुटली का नाही? तसंच एकच गोटा आतमध्ये दिसला. मागच्या काचेतून जर दगड मारला तो मागे लागला पाहिजे तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड तर रजनीकांतच्या सिनेमात मारला जाऊ शकतो. मागून दगड फेकला, तो पुढे येऊन लागला.

एवढा दगड लागल्यानंतर फक्त खरचटल्याच्या खुणा का? जखम का दिसत नाहीत? हा सगळा सिनेमा तयार करण्यात आला. आपण किंवा आपला मुलगा हरतोय म्हणून भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारच्या स्टोरीला शरद पवार यांच्यासह सर्वांनी इकोसिस्टिम उपलब्ध करुन दिली. मात्र त्यातलं सत्य उघड झालं आहे.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.