BJP Devendra Fadnavis Assets : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते प्रचार करताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांच्या मतदारसंघात प्रचार करीत आहेत. पण, तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण किती मालमत्ता आहे? किंवा त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे, हे माहीत आहे का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑक्टोबर रोजी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जाबरोबर जोडलेल्या शपथपत्रात फडणवीसांनी आपल्या मालमत्तेसह इतर बाबींची माहिती दिली आहे. याच शपथपत्रात सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण मालमत्ता किती आहे, हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : “कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा

देवेंद्र फडणवीसांची एकूण मालमत्ता

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकूण ५.२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे ५६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि ४.६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यात शेतजमीन आणि निवासी मालमत्तेचाही समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुटुंबातील इतर एकाही सदस्याच्या नावे कार नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

अमृता फडणवीसांची एकूण मालमत्ता

देवेंद्र फडणवीसा यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावे ७.९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये ६.९ कोटी जंगम मालमत्ता आणि ९५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

हेही वाचा : अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश

फडणवीस दाम्पत्याकडे सुमारे १३ कोटींची संपत्ती आहे. शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून ६२ लाखांचे कर्ज घेतले आहे. तसेच अॅक्सिस बँक आरोपप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोर्टात केस केल्याची नोंदसुद्धा या शपथपत्रात केली आहे.

देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. २००९ पासून ते सलग निवडून येत आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. नुकतेच एका प्रचारादरम्यान त्यांनी आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आपण एकटे मुख्यमंत्री आहोत, ज्याचे मुंबईच स्वत:चे घर नाही, असे बोलून दाखवले.
ते म्हणाले, “महाराष्ट्रात आजवर २० मुख्यमंत्री झाले. या २० मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझे घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असल्याचा अभिमान आहे.”