Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता याद्या जाहीर होत आहेत. महायुतीने आत्तापर्यंत १८२ जागा जाहीर केल्या आहेत. तर महाविकास आघाडीने १५८ जागा जाहीर केल्या आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) ६५ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या ४५ जागा आणि काँग्रेसच्या ४८ जागा जाहीर झाल्या आहेत. आज देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी नागपूरमध्ये बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आमची बैठक सकारात्मक झाली आहे. १० जागांवर तोडगा बाकी राहिला आहे. ज्या जागा बाकी आहेत त्यावर तोडगा काढू, बाकीच्या जागाही घोषित होतील. महायुती म्हणून जे काही काम होतं ते झालं आहे. तुम्ही विचारण्याआधी सांगतो की महायुतीचा फॉर्म्युला दहा जागांचं ठरलं की आम्ही तुम्हाला सांगू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महायुतीतले तीन घटक पक्ष यांनीही त्यांच्या जागा जाहीर केल्या आहेत. मात्र महायुतीचा फॉर्म्युला काय असेल हे सांगायची वेळ १० जागांचं ठरल्यावर सांगू असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- भाजपच्या पहिल्या यादीत गुहागरचा समावेश नाही, शिवसेना की भाजपा जागा लढणार याचा सस्पेंस कायम

२७८ जागांवर आमचं एकमत झालं आहे

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यांचं २७८ जागांवर एकमत झालं आहे. त्यामुळे टेन्शन फ्री वाटतं आहे. असं नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं. आज त्यांनी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याचीही खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आणि नाना पटोले यांनी ८५+८५+८५ अशा २७० जागांवर आमचं एकमत झाल्याचं म्हटलं आहे. कारण या संख्येची बेरीज २५५ होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपल्या खास शैलीत महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे? (फोटो-देवेंद्र फडणवीस एक्स पेज)

देवेंद्र फडणवीस यांनी उडवली महाविकास आघाडीची खिल्ली

काँग्रेसने माझ्याविरोधात उमेदवार जाहीर केला आहे त्यांनाही शुभेच्छा आहे. २७८ जागा आम्ही ठरवल्या आहेत. त्यामुळे टेन्शन फ्री झालो आहे. आमचा अजेंडा आम्ही केलेली विकासकामं आहेत. आम्ही ज्या वेगाने निर्णय घेतले आणि विकास केला त्यावरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. ८५+८५+८५ म्हणजे २७० हे जे काही महाविकास आघाडीचं गणित आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न सुपर कम्प्युटर आणि गणित तज्ज्ञ समजून घेत आहेत. असा टोला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis mocks of mva and it formula 85 each is equal to 270 what did he say scj