ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं आहे. या व्हिडीओ नंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांनी हा एकप्रकारे वोटजिहाद असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या व्हिडीओवरून विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आज खडवासला येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ ऐकवत महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं. महाविकास आघाडीच्या विजयासाठी वोट जिहादचा नारा दिला जातो आहे. या वोट जिहादचे मुख्य सुत्रधार कोण? हे आताच तुम्ही ऐकलं. मतांसाठी महाविकास आघाडीचे नेते मुस्लिमांची तवळे चाटत आहेत. हे लोक सांगतात, की आम्ही दंगेखोरांना सोडून देऊ. या ठिकाणी वोटजिहाद होत असेल, तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल. आता आपण एक राहलो, तरच सेफ ( सुरक्षित) राहू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

हेही वाचा – Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…

काही लोकांचा हेतू फक्त महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करणं नाही, तर दिल्लीतील भाजपाचे सरकार पाडणंसुद्धा आहे. या देशाला अस्थिर करण्याचं काम हे लोक करत आहेत. यात आता महाविकास आघाडीचाही समावेश झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक तुमची निवडणूक आहे. ही पुढच्या पिढ्यांसाठीची निवडणूक आहे. आता जर तुम्ही जागे झाला नाहीत, तर नंतर याचे परिणाम भोगावे लागतील, त्यामुळे मी तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे. जर तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित करायच्या असतील, तर कमळाच्या चिन्हावरील बटन दाबून भाजपाला विजयी करा आणि यांचे नापाक हेतू उधळून लावा, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

हेही वाचा – Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”

सज्जाद नोमानी नेमकं काय म्हणाले?

सज्जाद नोमानी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १६ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सज्जाद नोमानी यांनी मुस्लीम समाजाला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, “मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा (भाजपा) विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा (भाजपाचा) पराभव झाला, दिल्लीमधले त्यांचे सरकार अधिक काळ टीकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे.”

Story img Loader