Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दातली पोस्ट चर्चेत!

दिवाळी हे प्रकाशपर्व आहे, त्यानंतर विकासाचं प्रकाशपर्व साजरं करुया असंही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis One Word Post After Election Dates Declared in Maharashtra
निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दात प्रतिक्रिया (फोटो-देवेंद्र फडणवीस-एक्स पोस्ट)

Devendra Fadnavis महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. इतक्या दिवसांपासून महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार? ही तारीख गुलदस्त्यात होती. आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

Narendra Modi In maharashtra
हरियाणानंतर आता मोदींचं मिशन महाराष्ट्र; राज्यातील विविध प्रकल्पांंच्या उद्घाटनात म्हणाले…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
“ही तर जुनी बातमी, त्यात नवीन काय?” फडणवीस कोणाबाबत बोलले?
Guardian Minister Suresh Khade associate Mohan Wankhande in Congress
पालकमंत्री सुरेश खाडे यांचे सहकारी प्रा. मोहन वनखंडे काँग्रेसमध्ये
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : “एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि शक्ती बॉक्स”, अजित पवारांची लाडक्या बहिणींसाठी योजना
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray?
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे, त्यामुळेच…”; देवेंद्र फडणवीस यांची टीका
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
What Supriya Sule Said?
Supriya Sule : “देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदूक घेतलेलं पोस्टर, ही मिर्झापूर सीरिज..” सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

शंखनाद! या एका शब्दांत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टसह देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. जिस गतीसे है चला तू उस गती को पायेगा.. या गाण्यावरचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचे आक्रमक अंदाज दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. ते अपयश धुवून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) तयार आहेत असंच ते या पोस्टमधून सांगत आहेत असंच दिसून येतं आहे.

हे पण वाचा- Maharashtra elections 2024 : अमरावती : विधानसभा निवडणूक! भाजपची पाच जागांवर अडचण…

देवेंद्र फडणवीस यांची दुसरी पोस्ट काय?

लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण २०१४, २०१९ ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय. अशी पोस्टही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतल २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घेतली जाईल तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीने १७० ते १८० जागा मिळतील असा दावा केला आहे. तर महायुतीने आमचंच सरकार येईल असं म्हटलं आहे. या सगळ्यामध्ये नेमकं काय घडणार ते आता २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis one word post after maharashtra assembly election dates announced scj

First published on: 15-10-2024 at 16:33 IST

संबंधित बातम्या