Premium

“जानकर म्हणजे राज्याच्या तिजोरीची किल्ली, दिल्लीचीही किल्ली…”, देवेंद्र फडणवीसांचं मोदींसमोरच मोठं विधान; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागच्या खासदाराने फक्त बोलबच्चन दिले, महादेव जानकर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एवढा विश्वास संपादन करतील की…”

devendra fadnavis mahadev jankar
महादेव जानकरांच्या भवितव्याबाबत फडणवीसांचं विधान! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडलं. विदर्भातील पाच मतदारसंघांसाठी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. आता पुढचा टप्पा २६ एप्रिल रोजी परभणीसह बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली आणि नांदेड अशा ८ मतदारसंघांमध्ये होणार आहे. यापैकी नांदेड आणि परभणीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभा पार पडल्या. यावेळी परभणीतल्या सभेत मोदींच्या भाषणाआधी देवेंद्र फडणवीसांचं भाषण झालं. या भाषणात फडणवीसांनी महादेव जानकरांचं कौतुक करताना राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्याच त्यांच्याकडे असल्याचं विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परभणीमध्ये महादेव जानकर यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. जानकरांच्या शिट्टी या चिन्हासोबतच परभणीतील बॅनर्सवर भाजपाचं कमळ दिसत होतं. या शिट्टीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “महादेव जानकरांचं चिन्ह शिट्टी आहे. शिट्टीचं बटण दाबलं की मतदान मोदींना मिळतं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“…बनेगी तो परभणी!”

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी परभणीबाबत बोलल्या जाणाऱ्या विधानांचा उल्लेख करत त्यात बदल केला. “आजपर्यंत आपण म्हणायचो, ‘जगात जर्मनी आणि भारतात परभणी’. पण पुढच्या पाच वर्षांत भारतच जर्मनीच्या पुढे चाललाय. काही लोक असंही म्हणतात की ‘बनी तो बनी, नहीं तो परभणी’. आता तसं चालणार नाही. ‘बनी तो बनी, अभीही बनी और बनेगी तो परभणी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महादेव जानकर महाराष्ट्राच्या तिजोरीची किल्ली?

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महादेन जानकर हे महाराष्ट्राच्या तिजोरीची किल्ली असल्याचं विधान केलं. “महादेव जानकर म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी जानकरांचा शब्द टाळूच शकत नाही. जानकरांना निवडून दिलं की महाराष्ट्राची किल्ली हातात आली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“फडणवीस म्हणाले होते, ते आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि स्वत:…”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा!

दिल्लीच्या तिजोरीची किल्लीही जानकरांच्या हाती?

दरम्यान, यावेळी भविष्यात दिल्लीच्या तिजोरीच्या किल्ल्याही जानकरांच्या हाती असतील, असं फडणवीस म्हणाले. यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित होते. “महादेव जानकर मोदींचा एवढा विश्वास कमावतील की दिल्लीची किल्लीही त्यांच्या हातात येईल. त्यामुळे परभणीला चिंता करायची आवश्यकता नाही. मागच्या खासदाराने फक्त बोलबच्चन दिले, पण विकास केला नाही”, असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis parbhani rally speech for mahadev jankar narendra modi pmw

First published on: 20-04-2024 at 13:00 IST
Show comments