Devendra Fadnavis : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतो आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी तसे संकेत दिल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या. मात्र देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एका मुलाखतीत मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असं म्हटलं आहे. तसंच २०१९ मधल्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

२०१९ च्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. त्यावेळी सगळी बोलणी शरद पवार यांच्याशी झाली होती. शरद पवारांच्या सांगण्यावरुनच राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. तसंच सगळं काही ठरलं होतं, मात्र शरद पवार यांनी अचानकपणे अंग काढून घेतलं. त्यावेळी अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला आणि पुढाकार घेतला. मात्र आमचं ते सरकार चालू शकलं नाही असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा का दिल्या यावरही उत्तर दिलं आहे.

deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा दिल्या-फडणवीस

होय आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा दिल्या कारण एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली. अजित पवार एक वर्षे उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना दीड वर्षेच मिळाले. त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती. त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडेही लक्ष दिले. शिवाय त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचाही फायदा मिळाला. त्यामुळेच त्यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

हे पण वाचा- लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही-फडणवीस

तुम्हाला वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? हे विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविकच आहे. मात्र वस्तुस्थिती पाहायची असते. आघाडी किंवा महायुतीचं राजकारण हे वास्तवावर आधारीत असतं. तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कुठलीही शर्यत नाही, मी अशा अशा कुठल्याही शर्यतीत सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राज्याचं नेतृत्व करत होतो. त्यात महाराष्ट्रात अपयश आलं. मात्र त्यानंतरही पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली. माझ्यासाठी ही बाब पुरेशी आहे. मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी गौण बाब आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हे भाष्य केलं आहे.