पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांसारखा कोहिनूर निवडला आहे. डीसीएमचा अर्थ डबल सीएम. महाराष्ट्र देशाची आन, बान आणि शान आहे त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच जातं असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी केलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांनी विषाचा घोट महाराष्ट्रासाठी पचवला आहे असंही ते म्हणाले. मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा

दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी एका जैन मंदिरात छोटेखानी सभा घेण्यात आली. या सभेत नयपद्मसागरजी यांनी मुंबईतल्या जैन बांधवांना भाजपाला मतदान करण्याचं आणि महायुतीच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र आहे तर भारत आहे. महाराष्ट्रात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. धूप मे तपना मंजूर है पर नरेंद्र मोदीजी को एक वोट कम गिरना मंजूर नहीं असंही वक्तव्य त्यांनी केलं.

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट घेतला

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट घेतला आहे. फडणवीस महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत कोणी महाराष्ट्राच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. फडणवीस यांनी ज्यांना साथ दिली, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असे आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी म्हटले.

दक्षिण मुंबईमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना जिंकून आणण्यासाठी कामाला लागलेली आहे. या मोहीमेतंर्गत सोमवारी विशेष संपर्क अभियान जैन मंदिरात पार पडले. या अभियानाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित आहेत. दक्षिण मुंबईतील जैन मतदार महायुतीकडे वळवण्यासाठी विशेष संपर्क अभियान आज राबवले जात आहे.

हे पण वाचा- “शरद पवार हे अजित पवारांना व्हिलन बनवत होते, डावलत होते कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

फडणवीसांची विरोधकांविरोधात टोलेबाजी

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोले लगावले. माझ्या एनर्जीचा स्रोत नयपद्मसागरजी यांचा आशीर्वाद आहे. मुंबईत ज्यांनी जैन समाजाला शिव्या दिल्या, त्यांना जैन समाजाची ताकत कळाल्यानंतर वांद्र्यावरुन येऊन गुरुजींचं दर्शन घेतलंय. मुंबईत जैन समाज जर मतं देण्यासाठी आले, तर आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

महाराज हा राष्ट्राला प्रेरणा देतो. देशात सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. मोदींच्या ध्येयाला पुढं नेण्यासाठी सारे एकत्र आले पाहिजेत. उध्दव ठाकरे ज्या पेपरला मुलाखत देतात तो पेपर कोणीही वाचत नाही. ठरलेली लोक मुलाखत घेतात. आम्ही त्याच्याकडे बघतही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.