Devendra Fadnavis : शरद पवारांनी साताऱ्यात २०१९ मध्ये घेतलेली पावसातली सभा महाराष्ट्र विसरलेला नाही. शरद पवार हे तेव्हा पावसात भिजले होते. त्या एका सभेने सगळी निवडणूक फिरवली होती. तसंच तीन दिवसांपूर्वीही शरद पवार कोल्हापूरमध्ये पावसात भिजले. आता पावसात भिजलं म्हणजे निवडून येता येतं असं नाही असा टोला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी

महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. तसंच मनसेनेही त्यांचे उमेदवार दिले आहेत. इतकंच नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि तिसरी आघाडीही मैदानात आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा-महायुतीला फटका बसला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीने जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीत काय होतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. महाविकास आघाडीने १८० हून जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर महायुतीने आम्हीच जिंकू असा दावा केला आहे.

हे पण वाचा- राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार

काय घडलं होतं २०१९ मध्ये

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागली. तिथे श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यात गेले. या प्रचार सभेवेळी अचानक पाऊस आला. भर पावसातही शरद पवार यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. ते बोलत राहिले. तसंच सातारकरांची माफीही मागितली होती. शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. अन् या पावसाची महाराष्ट्रासह देशात चर्चा झाली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटलांचा विजय झाला. यात शरद पवार यांच्या पावसातील सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. या सभेची आठवण तीन दिवसांपूर्वी कोल्हापूकरांना झाली. कारण कोल्हापूरमध्येही अशीच पावसातली सभा पार पडली. मात्र या सभेवरुन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

आज काल आम्हाला काही लोक सांगत आहेत की पावसात भिजलो, आता निवडून येणार. मी त्यांना सांगतो तुम्हाला तो पाऊस आहे आमच्याकडे तो पाऊस आहे, मतांचा. निवडून येण्यासाठी मतांचा पाऊस लागतो. असं म्हणत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis taunts to sharad pawar over his rain rally what did he say scj