Premium

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली!, शरद पवार गटात जाणं जवळपास निश्चित, माढ्यात घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडणं हा भाजपासाठी धक्का मानला जातो आहे.

Dhairyasheel Mohite Patil
धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोडली भाजपाची साथ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला एक धक्का देणारी बातमी आहे. कारण माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपाने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज असून वेगळी चूल मांडतील या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसंच धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच शरद पवारांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आता मोहिते पाटील रणजीतसिंह निंबाळकरांविरोधात तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी काय म्हटलं आहे?

मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केलं. तसंच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले.

Jitendra Awhad statement regarding EVM
Jitendra Awhad: ईव्हीएमबाबत शासंकता; आमदार जितेंद्र आव्हाड
Assembly Election 2024 Kopri Pachpakhadi Constituency Chief Minister Eknath Shinde wins
Kopri Pachpakhadi Constituency: कोपरी पाचपाखाडीतुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
mahayuti candidate shekhar nikam defeat mva candidate prashan yadav
चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकम यांनी गड राखला;  प्रशांत यादव यांचा पराभव
Devendra Fadnavis video, emotional video of Devendra Fadnavis, Maharashtra Assembly Election 2024,
VIDEO : ‘मै समंदर हू लौट कर वापस आऊंगा..,’ विजयानंतर फडणवीसांचा भावनिक व्हिडिओ प्रसारित
Raj Thackeray
Raj Thackeray : मनसेचं ‘इंजिन’ रुळावरून घसरलं? विधानसभेच्या निवडणुकीत सुपडा साफ; राज ठाकरेंना जनतेनं का नाकारलं?
assembly election 2024 Krantibhoomi BJPs Bhangdia won by 10171 votes sparking discussions about Modis win and Gandhis loss
चिमूर क्रांतीभूमित मोदी जिंकले, राहुल हरल्याची चर्चा
Amit Thackeray First Post After Defeat in Mahim
Amit Thackeray : पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली पोस्ट, “लढाई राजपुत्राची नसून..”
EKNATH SHINDE Maharashtra
Shivsena : जनतेच्या दरबारी ‘शिवसेने’चा निकाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “असली – नकलीमध्ये…”

हे पण वाचा- १४ एप्रिलला शरद पवार गटात प्रवेश, १६ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार? धैर्यशील मोहिते म्हणाले…

आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती

आपला
धैर्यशील मोहिते पाटील

dhairyasheel mohite patil resignation
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे.

असं राजीनामा पत्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना उद्देशून लिहिलं आहे. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा देणं सूचक मानलं जातं आहे.

शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा

भाजपाने जेव्हा लोकसभेची महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर केली त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीवरुन अकलूजच मोहिते पाटील नाराज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तसंच धैर्यशील माने यांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली आहे. शरद पवारांनी माढ्यात भाकरी फिरवली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. १३ एप्रिलला धैर्यशील माने अकलूजमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील आणि शरद पवार त्यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करतील हे निश्चित मानलं जातं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhairyasheel mohite patil resignation from bjp party and membership is sure to enter ncp sharad pawar group says sources scj

First published on: 12-04-2024 at 07:43 IST

संबंधित बातम्या