Dhananjay Munde affidavit for Maharashtra Assembly Election 2024 : राज्याचे कृषीमंत्री व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) पुन्हा एकदा विधानसभेचं तिकीट दिलं आहे. गुरुवारी (२४ ऑक्टोबर) त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने परळीमधून राजेसाहेब देशमुख (शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेवार) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पाच अपत्यांचा उल्लेख केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर कलेलेल्या शपथपत्रात तीन अपत्यांचा उल्लेख होता.

२०१९ च्या निवडणुकीवेळी मुंडे यांनी सादर केलेल्या शपथपत्रांत त्यांच्या दोन अपत्यांचा उल्लेख नव्हता. कारण तेव्हा ही दोन मुलं त्यांच्यावर अवलंबून नव्हती, असं त्यांच्या शपथपत्रातील माहितीवरून लक्षात येत आहे. शिवानी व सिशिव मुंडे अशी या दोन मुलांची नावं आहेत.

Maharashtra Assembly Election 2024
Mahayuti Politics : पक्ष शिंदे अन् अजित पवारांचे, उमेदवार मात्र भाजपाचे! फडणवीसांच्या ‘या’ पाच शिलेदारांकडून समन्वयाचं राजकारण
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Aheri Legislative Assembly Bhagyashree Atrams candidacy from NCP Sharad Pawar faction sets up father daughter battle
अहेरीत पिता-पुत्रीत थेट लढत; शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी
Sonam Wangchuks hunger strike
Sonam Wangchuck : सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे; लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?
mahayuti uddhav sharad nana Express photo by Sankhadeep Banerjee 2
Nana Patole : “मविआत ४-५ जागांवर मतभेद…”, नाना पटोले स्पष्टच बोलले; काँग्रेसच्या यादीबाबत म्हणाले…
Maharashtra Politics :
Akhilesh Yadav : ‘मविआ’चे जागावाटप जाहीर होण्याआधीच ‘सपा’चे ५ उमेदवार जाहीर, आणखी ७ जागांची मागणी; अखिलेश यादवांकडून दबावाचं राजकारण?
gauri lankesh murder accused removed from shiv sena after eknath shinde steps
गौरी लंकेश हत्येतील आरोपीची शिवसेनेतून हकालपट्टी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई
mla sanjay gaikwad reaction on cm face in mahayuti
भावी मुख्यमंत्री कोण हे तर फडणवीसांनीच स्पष्ट केले; आ. गायकवाड म्हणतात,‘बहीण, सामान्यांच्या…’
Dhananjay Munde affidavit
धनंजय मुंडे यांनी सादर केलेलं शपथपत्र (२०२४) (PC : Election Commission)

हे ही वाचा >> Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रात उल्लेख केलेल्या अपत्यांची नावे

वैष्णवी मुंडे
जान्हवी मुंडे
आदीश्री मुंडे
सिशिव मुंडे
शिवानी मुंडे

Dhananjay Munde affidavit
२०१९ च्या निवडणुकीवेळी सादर केलेलं शपथपत्र (PC : Election Commission)

पाच वर्षांत संपत्ती दुप्पट

दरम्यान. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात दुपटीहून अधिक झाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं की त्यांच्याकडे एकूण २३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केलं आहे की त्यांच्याकडे ५३.८० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हे ही वाचा >> Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला दणका, कोल्हापुरातील विद्यमान आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

२०१९ चा परळी विधानसभा निवडणुकीचा निकाल

१. धनंजय मुंडे – १,२२,११४

२. पंकजा मुंडे – ९१,४१३

३. भीमराव सातपुते – ४७१३

धनंजय मुंडेंसाठी यंदाची निवडणूक अवघड

२००९ साली गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची लेक पकंजा मुंडे यांनी परळीचे नेतृत्व केले. दोन टर्म आमदार राहिल्यानंतर २०१९ साली धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर आहेत. पकंजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वितुष्टही संपले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर यावेळी मुंडे घराण्याचा उमेदवार नाही. पण धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या डावपेचांचा मात्र सामना करावा लागणार आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंचेच एकेकाळचे सहकारी असलेले बजरंग सोनवणे यांना पुढे आणून उमेदवारी दिली आणि त्यांना जिंकवलं. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजेसाहेब देशमुख हा नवा मोहरा उभा केला आहे.