लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात देशभरात जे निवडणुकीचे टप्पे पार पडले ते संपताना चर्चा होऊ लागली आहे ती एक्झिट पोलची. एक्झिट पोलच्या माध्यमातून ढोबळमानाने काही अंदाज वर्तवले जातात. निकालाचे सगळे टप्पे संपल्यावर एक्झिट पोल दाखवला जाईल. देशात रविवारी (१९ मे) संध्याकाळी एक्झिट पोल दाखवला जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावरच अशा प्रकारचा एक्झिट पोल दाखवला जावा असा भारतात नियम आहे. एक्झिट पोलमध्ये निकालाचा ढोबळमानाने अंदाज वर्तवला जातो. आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.

Exit Poll: …या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला

Narela Assembly Election Result 2025
Private: Narela Vidhan Sabha Election Result 2025 Live: नरेला विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi Vidhan Sabha Poll 2025
Delhi Exit Poll Results 2025 : दिल्लीत सत्तांतर? दहापैकी आठ मतदानोत्तर चाचण्यांचा भाजपला कौल
Delhi Exit Poll
Delhi Election : “चौथ्यांदा असं घडतंय…”, एक्झिट पोलमधील अंदाज विरोधात असूनही ‘आप’ला का आहे विजयाची खात्री
Delhi Exit Poll
दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल
Delhi Assembly Election Exit Poll Results 2025
Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Delhi Assembly Elections 2025 Live Updates in Marathi
Delhi Exit Poll Results 2025 : “दिल्लीत आम्हीच सत्ता स्थापन करू”, Exit Poll नंतर आम आदमी पक्षाचा दावा
Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ

ओपिनियन पोल आणि सर्व्हे या दोन्हीपेक्षा एक्झिट पोल वेगळा ठरतो. त्यामुळेच हा एक्झिट पोल बऱ्याच अंशी निकालाच्या जवळ जाणारा ठरतो. ज्या दिवशी मतदान होते त्याच दिवशी माहिती गोळा केली जाते. देशात कोणत्या टप्प्यांमध्ये किती टक्के मतदान झाले? नवमतदार किती होते? साधारण मतदारांचा कौल कुणाच्या दिशेने आहे? मतदारांचा राग कोणत्या पक्षावर आहे? मतदारांना पंतप्रधान म्हणून कोणता नेता हवा आहे? कोणत्या पक्षाची कामगिरी समाधानकारक वाटते? हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्याची जी उत्तरं येतात त्यावरून निवडणुकीचे सगळे टप्पे संपल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज बांधला जातो. जनभावना काय असू शकते याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेला असल्याने तो निकालाच्या जवळ जाणारा ठरतो. भारतात एक्झिट पोल मतदानाचे सगळे टप्पे संपल्यावरच दाखवण्यास परवानगी आहे.

Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय ?

सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.

लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. आता रविवारी म्हणजेच १९ मे रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यासाठीचं मतदान पार पडलं की एक्झिट पोल येण्यास सुरूवात होईल. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.

 

Story img Loader