कर्नाटकमधील दणदणीत विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयामागे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा मोठा वाटा असल्याचं बोलले जात आहे. अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवकुमार भावनिक झालेले पाहायला मिळाले. यावेळी ते सोनिया गांधी याचं नाव घेत ढसाढसा रडले. ते शनिवारी (१३ मे) बंगळुरू येथे माध्यमांशी बोलत होते.

डी. के. शिवकुमार म्हणाले, “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू.”

jp nadda
दिल्लीकर लाडक्या बहिणींसाठी भाजपाची अडीच हजारांची घोषणा, जाहीरनाम्यात मोफत सिलिंडरसह ५०० रुपयांचं अनुदानही!
History of Delhi Assembly Elections Results
Delhi Election Results History: दिल्लीत पुन्हा रणसंग्राम, काय…
EC on Delhi Election 2025 Dates| Delhi Election 2025 Dates Schedule
Delhi Election 2025 Dates : ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : आगामी महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल? बावनकुळेंचं मोठं विधान, म्हणाले, “तोच निर्णय…”
vaibhav patil loksatta online quiz winner
वैभव पाटील ठरले लोकसत्ता ऑनलाईन निवडणूक मेगा क्विझचे विजेते; जिंकला स्मार्टफोन
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : “मला जी वागणूक दिली, अपमानित केलं, म्हणून मी…”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं विधान
Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…

“सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या”

“मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे,” असं शिवकुमार यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार? विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले…

“हे कुणा एका व्यक्तीच्या कामाचं यश नाही”

“मी सिद्धरमय्या, सर्व आमदार आणि राज्यातील माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. त्यांनी जबाबदारी घेऊन बुथ पातळीवर काम केलं. हे कुणा एका व्यक्तीच्या कामाचं यश नाही. मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मी नंतर भारत जोडो भवन येथे येऊन या सर्व गोष्टींवर बोलेन,” असंही डी. के. शिवकुमार यांनी नमूद केलं.

Story img Loader