Premium

अमित शाहांचा कोकणातून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत म्हणाले…

दहा वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आहे, असंही अमित शाह म्हणाले.

Amit Shah
अमित शाह रत्नागिरी दौऱ्यावर (फोटो – Amit Shah/X)

रत्नागिरी -सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं आव्हान असणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही यंदा ही जागा भाजपाला देण्यात आली. नारायण राणे यांच्यासाठी आज खुद्द केंद्रीय मंत्री अमित शाह प्रचारसभेसाठी कोकणात आले आहेत. कोकणातून त्यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

सिंधुदुर्गच्या भूमीवर मी आपल्यासमोर आज उभा आहे. ऐतिहासिक सिंधुदूर्ग किल्ला हिंदवी स्वराज्यची आठवण करून देतो, असं अमित शाह सुरुवातीला म्हणाले. पुढे ते म्हणाले, “मी आज सिंधुदूर्ग – रत्नागिरीत आलो आहे. तर एवढंच सांगेन की आजच्या नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात वीर सावरकर यांचं नाव भाषणात घेण्याची हिंमत आहे का? सावरकरांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात नाही तर तुमची कसली शिवसेना. तुमची नकली शिवसेना आहे.”

Bachchu Kadu Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Bachchu Kadu : माझ्याशिवाय सरकार बनणार नाही म्हणणाऱ्या बच्चू कडूंचा पराभव; भाजपाचे प्रविण तायडे विजयी
NCP Ajit Pawar MLA Anna Bansode scored hatt rick from Pimpri Assembly constituency in city
पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक
Chandrashekhar Bawankule, Suresh Bhoyer Congress,
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पिछाडीवर, कॉंग्रेसचे सुरेश भोयर आघाडीवर
Marathi Actor Abhijeet Kelkar Post For Devendra Fadnavis
“सूर्य पुन्हा एकदा तळपला…”, देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Counting of votes stopped in Rajura, Rajura,
चंद्रपूर : राजुरात मतमोजणी थांबवली; कारण…
Wardha District Assembly Result, Arvi, Deoli,
वर्धा जिल्हा १०० टक्के भाजपमय? चारही मतदारसंघांत विजयाकडे वाटचालीची चिन्हे
Chembur Assembly Election Results 2024
Chembur Assembly Election Results 2024 : चेंबूरमध्ये मतांसाठी शेकड्यांवर घासाघीस; सहा फेऱ्यांनंतरही गाडी पुढे जाईना
mahayuti landslide victory in maharashtra vidhan sabha election 2024
‘बटेंगे…’ , लाडकी बहीण, पायाभूत सुविधा या त्रिसूत्रीमुळे महायुतीचा महाविजय! संघ, फडणवीसही शिल्पकार!

हेही वाचा >> “माझ्या नणंदेची जागा…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शर्मिला पवारांचं समर्थन; म्हणाल्या, “सुप्रियाताई जन्माने…”

दहा वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आहे. मोदींना पुन्हा एकदा मतदान केल्यास हीच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणारी आहे, असं शाह म्हणाले.

मोदींना पंतप्रधान बनवण्याचा अर्थ आहे की देश सुरक्षित आहे. काश्मीर आमचा आहे की नाही? काश्मीर आमचा आहे, पण खर्गे म्हणतात की राजस्थान आणि महाराष्ट्रातील लोकांचा काश्मीरचा काय संबंध. रत्नागिरी सिंधुदुर्गातील लहान मुलगाही काश्मीरसाठी आपले प्राण देऊ शकतो”, असंही अमित शाह म्हणाले.

इंडिया आघाडी देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही

“पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प मोदींनी महाराष्ट्रासाठी दिले आहेत. गुंतवणुकीत भारताने महाराष्ट्राला नंबर वन बनवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना केलं. हे लोक देशाचा विकास नाही करू शकत नाही. देशाला सुरक्षित नाही ठेवू शकत. देशाला एक ठेवू शकत नाही. देशाच्या समस्या सोडवू शकत नाहीत. देशाला समाधान नाही करू शकत. हिंदूंच्या समाधानासाठी काही करू शकत नाहीत”, असं अमित शाह म्हणाले.

“नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या दादागिरीसमोर भरपूर संघर्ष केला आहे. भाजपाने खूप मोठा चेहरा कोकणासाठी दिला आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने जिंकवण्याचं काम करा”, असं आवाहनही त्यांनी केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Does uddhav thackeray have the guts to take the name of freedom fighter savarkar in his speech amit shahs attack from konkan sgk

First published on: 03-05-2024 at 16:52 IST

संबंधित बातम्या