नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक शुक्रवारी शांततेत पार पडली. पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली.

सर्वाधिक मतदानाची नोंद नक्षलप्रभावित गडचिरोली-चिमूर मतदारसंघात (६६.३० टक्के) तर सर्वात कमी संपूर्णत: शहरी असलेल्या नागपूर मतदारसंघात (५१.५४ टक्के) झाली. रामटेकमध्ये ५५.४६ टक्के, भंडारा-गोंदियात ६१.३७ टक्के आणि चंद्रपूरमध्ये ५७.९ टक्के मतदानाची नोंद झाली.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
Image Of Ramesh Bidhuri.
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) या भाजपच्या दोन दिग्गज उमेदवारांसह नागपूरमधून काँग्रेसचे आ. विकास ठाकरे, चंद्रपूरमधून आ. प्रतिभा धानोरकर, गडचिरोलीतून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते (गडचिरोली), सुनील मेंढे (भंडारा-गोंदिया) यांच्यासह इतर सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

हेही वाचा >>> पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी नागपुरात मतदान केले. भंडारा जिल्ह्यात पाहुणी मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडले. याच जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील तिल्ली-मोहगाव केंद्रावर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे मतदान दोन तास विलंबाने सुरू झाले. गडचिरोली जिल्ह्यात तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्यात तीन ठिकाणी ईव्हीएम बंद पडले. प्रशासनाने अहेरीतून हेलिकॉप्टरने दुसरे यंत्र मागवले. त्यानंतर मतदान सुरू झाले. मतचिठ्ठयांद्वारे भाजपचा प्रचार केला जात असल्याच्या आरोपावरून काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नागपुरात झालेल्या वादावादीचा अपवाद सोडला तर इतरत्र मतदान शांततेत पार पडले.

मतदार यादीतून नावे गहाळ

मतदार यादीतून नावे वगळल्याच्या तक्रारी नागपूरसह सर्वच मतदारसंघात करण्यात आल्या. अनेक मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र होते, पण त्यांचे नाव यादीत नव्हते. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. नागपूरमध्ये अशा अनेक तक्रारी आल्या. कुठलीही पूर्वसूचना न देता नावे वगळण्यात आल्याने काही मतदारांनी केंद्रावरच संताप व्यक्त केला. 

किती मतदान?

५१.५४%      नागपूर

६६.३०%   गडचिरोली-चिमूर

५५.४६%      रामटेक

६१.३७%   भंडारा-गोंदिया

५७.९ %       चंद्रपूर 

Story img Loader