Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षाचा मेळावा पार पडला. या निवडणुकीला अवघे २९ दिवस उरले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारावर जास्तीत जास्त भर दिल्याचं दिसून येतं आहे. मुक्ताई नगर येथील प्रचारात त्यांनी लाडकी बहीण ( Ladki Bahin Yojana ) योजनेवर पुन्हा एक भाष्य केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“मी आज तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. हेलिकॉप्टरमधून उतरल्यापासून मला जनतेचा महासागर पाहण्यास मिळाला. मी विचारलं सभेला माणसं आहेत का? इथे आल्यावर पाहिलं तर प्रचंड मोठी सभा आहे. गुलाबराव म्हणाले लाडक्या बहिणींनी मनावर घेतलं की त्या कुणाचंच ऐकत नाहीत. आता लाडक्या बहिणीही ( Ladki Bahin Yojana ) माझ्या लाडक्या भावांना काय करायचं ते सांगणार आहेत.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra assembly election 2024 eknath shinde cheated me says palghar mla srinivas vanga
एकनाथ शिंदेंनी मला फसवलं; उमेदवारी डावललेल्या आमदार श्रीनिवास वनगा यांचे वक्तव्य
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Deepak Kesarkar, Rajan Teli , Sawantwadi Assembly
सावंतवाडी विधानसभेचे प्रतिस्पर्धी दिपक केसरकर व राजन तेली श्री देव विठ्ठल मंदिरमध्ये एकत्र
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”

हे पण वाचा- Ladki Bahin Yojana Bank Strike: लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचारी पुकारणार संप; काय आहेत आरोप?

विरोधकांच्या बुडाखाली आत्ताच फटके फुटू लागले आहेत

“सध्या दिवाळी जवळ आली आहे, पण त्याआधीच विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटू लागले आहेत. २३ तारखेच्या निकालाच्या दिवशी महायुतीच्या विजयाचा धमका होईल तो आयटम बॉम्बसारखा असेल. २३ नोव्हेंबरला चंदू भय्यांच्या विजयाचे फटाके फुटल्याशिवाय राहणार नाहीत. चंद्रकांत पाटील बाळासाहेब ठाकरेंचा कडवट आणि सच्चा शिवसैनिक आहे. मागच्या दोन ते अडीच वर्षांत मुक्ताई नगर मतदारसंघात पाच हजार कोटींचा निधी आपण दिला आहे. आपल्या महायुतीच्या आमदारांच्या मतदारांच्या मतदारसंघात निधी दिला आहे. मी दोन्ही हाताने देण्याचं काम करणारा मुख्यमंत्री आहे हे विसरु नका. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही मुख्यमंत्री , तसंच मंत्री गुलाबराव बसले आहेत. मी जेव्हा सांगितलं की लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana ) करायची आहे ते व्हा विरोधकांना ही निवडणुकीपुरती घोषणा वाटली. पैसे येणार नाहीत, योजना कागदावर राहिल. पण तसं घडलं नाही. मी आनंद दिघे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै खुदकी भी नहीं सुनता.” असा डायलॉगही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

लाडकी बहीण योजना आणल्याने विरोधक चक्रावले आहेत

लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana ) आणली तेव्हा एका महिन्याच्या आत अंमलबजावणी केली. विरोधक चक्रावले, त्यांचे डोळे पांढरे झाले आणि तोंड काळं झालं. मग विरोधक म्हणू लागले की पैसे आलेत तर काढून घ्या. आमचं सरकार देणारं सरकार आहे. देना बँक आहे, लेना बँक नाही. आपण पाच हप्ते दिले आहेत. आचारसंहिता लागल्यावर पैसे दिले जाणार नाहीत असं सांगत होते, त्यामुळे आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने योजना स्थगित केली अशी अफवा पसरवली. आता आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचा हप्ताही तुमच्या खात्यात येणार.

लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही

“मी गरिबी पहिली आहे, म्हणून मी ठरवले आहे देण्याची वेळ आली तर आपण द्यायचं. कोणी माईका लाल आला तरीही लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana ) कधीही बंद होणार नाही, तुम्ही ताकद दिली तर दोन हजार, तीन हजार रुपये देण्यात येतील. देण्याची दानत महायुती सरकारमध्ये आहे, मला बहिणी लखपती झालेल्या पहायचं आहे, असेही एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. आम्ही कुणालाही फसवणारे नाही. माझी आई कशी काटकसर करायची मला माहीत आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader