Eknath Shinde : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे कारण या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. या यशात भाजपाच्या सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत आणि अजित पवारांच्या ४१ जागा मिळाल्या आहेत. आता पेच आहे तो मुख्यमंत्रिपदाचा. मुख्यमंत्री कोण होणार? याच्या विविध चर्चा सुरु आहेत. अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमची हरकत नाही असं म्हटलं आहे. मात्र एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी तसं अनुमोदन दिलेलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस हा पेच महायुतीमध्ये कायम आहे.

भाजपाकडून एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाकडून एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून निश्चित झाल्याचंही समजतं आहे. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अशात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) मुख्यमंत्री झाले नाहीत तर काय पर्याय असू शकतात? हे आपण जाणून घेऊ.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

हे पण वाचा- Uday Samant : “महायुतीत जो मुख्यमंत्री होईल त्या नेत्याला…”; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य

केंद्रात एकनाथ शिंदे मंत्री होऊ शकतात

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते तेव्हाच समाधानी होतील जेव्हा त्यांना त्यापेक्षा मोठी जबाबदारी किंवा पद मिळेल. त्यामुळे त्यांच्यापुढे केंद्रातल्या सरकारमध्ये मंत्री होण्याचा पर्याय आहे. रामदास आठवले यांनीही हा पर्याय एकनाथ शिंदे यांना दिला आहे. मध्य प्रदेश पॅटर्न जर भाजपाने वापरला तर शिवराज सिंह चौहान यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनाही केंद्रात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. मोदी सरकार ३.० मध्ये एकनाथ शिंदे मंत्री होऊ शकतात असा एक पर्याय त्यांच्यासमोर आहे.

एकनाथ शिंदेंपुढचा दुसरा पर्याय काय?

एकनाथ शिंदेंना हा पर्याय मान्य नसेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहायचं असेल तर त्यांच्यापुढे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा पर्याय आहे. तसा पर्याय निवडला तर फारसा काही बदल होणार नाही उलट ते सत्तेत सक्रिय असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून जसं देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं तसंच काम एकनाथ शिंदेही करु शकतील. याबरोबरच अनेक महत्त्वाची खाती त्यांना त्यांच्याकडे ठेवण्याची संधी या निमित्ताने असेल.

एकनाथ शिंदेंपुढचा तिसरा पर्याय काय?

एकनाथ शिंदे यांच्यापुढचा तिसरा पर्यायही असू शकतो तो असेल महायुतीची साथ सोडण्याचा. पण तसं घडलं तर तो राजकीयदृष्ट्या आत्मघातकी निर्णय ठरेल. एकनाथ शिंदेंनी महायुतीची साथ सोडली तरीही महायुतीकडे इतक्या जागा आहेत की सरकार येईल. हा पर्याय निवडणं हे त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या नुकसान करणारं ठरणार आहे. त्यामुळे हा पर्याय ते निवडणार नाहीत. सरतेशेवटी वरच्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे असणार आहे.