Eknath Shinde Serious Mood : महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्रात महायुतीला एकूण २३९ जागा मिळाल्या आहेत. या निकालाला पाच दिवस उलटून गेले आहेत तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही. दरम्यान अजित पवार यांनी ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होईल असा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातल्या पत्रकार परिषदेनंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Serious Mood ), देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे पहिल्यांदाच दिल्लीला एकत्र गेले आहेत. महायुतीच्या या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात महायुतीतलं पक्षीय बलाबल कसं आहे?
महाराष्ट्रात महायुतीला एकूण २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १३२ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपा १३२ आमदारांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर त्यांच्या शिवसेनेचे ४ पुरस्कृत आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Serious Mood ), यांच्याकडे ६१ आमदारांचं बळ आहे. तर अजित पवार यांच्याकडे ४१ आमदारांचं बळ आहे कारण त्यांनी तेवढे आमदार निवडून आणले आहेत. असं असलं तरीही मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेन्स कायम आहे.
दिल्लीतल्या बैठकीचा फोटो चर्चेत
दिल्लीत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Serious Mood ),, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही आहेत. दरम्यान हा फोटो चर्चेत आला आहे कारण या फोटोंमध्ये अमित शाह यांच्यासह सगळे दिग्गज नेते हसताना आणि आनंदी दिसत आहेत. अपवाद आहे तो एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याचा. एकनाथ शिंदे या फोटोंध्ये उभे आहेत मात्र त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या गांभीर्याने लक्ष वेधलं आहे. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे हे कळल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Serious Mood ), यांनी पत्रकार परिषद घेऊन मी नाराज नाही तसंच मी सत्तास्थापनेतला अडसर होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र या फोटोंतली त्यांची बॉडी लँग्वेज हेच सांगते आहे की त्यांना बहुदा हे सगळं पटलेलं नाही. अर्थात हा फक्त अंदाज आहे, दावा नाही. कारण एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरचे भावच हे सगळं बोलून जात आहेत.
एक फोटो करतो हजार शब्दांचं काम
एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Serious Mood ), यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव चर्चेत आले आहेत. विशेषतः अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे सगळे दिलखुलासपणे हसत आहेत, आनंदी आहेत. मात्र एकनाथ शिंदे हे त्या अमित शाह यांच्या भेटीदरम्यान गंभीर दिसत आहेत. त्यामुळे एक फोटो हजार शब्दांचं काम करतो याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. दिल्लीतल्या बैठकीत काय होणार? देवेंद्र फडणवीस यांचं नावच निश्चित होऊन तेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील का? हे सगळं काही अजून ठरायचं आहे. तूर्तास हा फोटो आणि एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव चर्चेत आले आहेत.