देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा नुकताच निकाल लागला असताना आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. आयोगाना जाहीर केलेल्या तारखेनुसार आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निमित्ताने आता कोल्हापुरात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
निवडणूक आगोयाने जाहीर केल्यानुसार येत्या २४ मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्या सुरुवात होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २८ मार्च असेल. तर १२ एप्रिल प्रत्यक्ष रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून १६ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतरासंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
दरम्यान, चंद्रकांत जाधव यांच्या श्रद्धांजली सभेत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा विचार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी बोलून दाखवली होता. तथापि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष ही निवडणूक लढवणार आहे, असे जाहीर केले आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांचीही नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून देऊन चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
गत निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत महा विकास आघाडीचे नेते कोणती भूमिका घेतात यावर निवडणूक प्रामुख्याने दुरंगी होणार की तिरंगी याचा निर्णय होणार आहे.
दरम्यान आम आदमी पक्ष, रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे बाळ नाईक यांच्यासह अन्य काही उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे. तर आज पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.