Election Commission : “हरियाणा निकालांवरुन तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी..” निवडणूक आयोगाचं मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर

निवडणूक आयोगाला मल्लिकार्जुन खरगेंनी एक पत्र पाठवलं होतं. या पत्राला निवडणूक आयोगाने उत्तर दिलंं आहे.

EC Answer to Mallikarjun Kharge
निवडणूक आयोगाचं मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर (फोटो-इंडियन एक्सप्रेस)

Election Commission हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांचे निकाल मंगळवारी (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. या निकालांमध्ये हरियाणात भाजपाने बाजी मारली. ५० जागा मिळवत भाजपाने बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीचे कल जेव्हा येत होते तेव्हा मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांनी निवडणूक आयोगाला ( Election Commission ) पत्र लिहिलं होतं. निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. आता निवडणूक आयोगाने या पत्राला उत्तर दिलं आहे.

जयराम रमेश काय म्हणाले होते?

जयराम रमेश म्हणाले होते, “आम्ही निवडणूक आयोगाकडे ( Election Commission ) निवेदन देऊन तक्रार करणार आहोत. मतमोजणीच्या दहा ते बारा फेऱ्यांचे निकाल समोर आले आहेत. पण संकेतस्थळावर चार ते पाच फेऱ्यांचेच आकडे दाखविले जात आहेत. त्यामुळे माध्यमांनीही चुकीच्या बातम्या दाखविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला होeता. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याप्रकारे त्यांनी स्थानिक प्रशासनावर दबाव टाकणे योग्य नाही.”

निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?

काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेली वक्तव्यं योग्य नाहीत. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित आहेत असं म्हटलं आहे. याकडेही निवडणूक आयोगाने लक्ष वेधलं आहे. अशा प्रकारची वक्तव्यं करण्याचं कारण काय? हे आम्हाला सांगा त्यासाठी थेट आमच्याशी संपर्क साधा असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. काँग्रेसच्या १२ सदस्यीय समितीने आमच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितला आहे. मात्र या समितीत आमच्यावर विश्वास न ठेवणारे नेतेही सहभागी आहेत.

काँग्रेसचा आरोप काय होता?

हरियाणा विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागत होते, त्यावेळळी काँग्रेस नेत्यांनी काही वक्तव्यं केली होती. त्यावरुन आता निवडणूक आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना उद्देशून पत्र लिहिलं आहे आणि नेते करत असलेली ही वक्तव्यं चुकीची आहेत असं म्हटलं आहे.काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, निवडणुकीचे वार्तांकन करत असताना माध्यमे यावेळी पहिल्यांदाच थेट मतदान केंद्रावरून आकडेवारी घेत नाहीये तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी दाखवत आहे. मतदानाच्या फेऱ्या १० च्या पुढे पोहोचल्या आहेत. मात्र आयोगाच्या संकेतस्थळावर जुनीच आकडेवारी दिसत आहे. विनेश फोगटचे उदाहरण घ्या. त्यांना पिछाडीवर दाखवले गेले होते. मात्र दहाव्या फेरीनंतर त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अपडेट केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. या सगळ्या संदर्भातल जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगावर ( Election Commission ) टीका केली होती. यावर आता निवडणूक आयोगाने ( Election Commission ) पत्र लिहून या सगळ्या आरोपांचं उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election commission answer to mallikarjun kharge about jayram ramesh and pawan khera statement scj

First published on: 09-10-2024 at 18:42 IST
Show comments