ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तर झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राची विधानसभा संपुष्टात येण्याआधी नवीन विधानसभा गठीत होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि निकाल पूर्ण होईल, असे सांगितले होते.

हे वाचा >> Model Code of Conduct in Maharashtra Elections 2024 : आचारसंहितेत काय करता येते, काय करता येत नाही?

aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
baba siddque and sitharam yechury
Year Ender 2024 : सीताराम येचुरी ते बाबा सिद्दिकी, ‘या’ भारतीय राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला अखेरचा श्वास!
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
Maharashtra Assembly Winter Session Live Updates in Marathi| Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates
Maharashtra Assembly Winter Session Updates: “इथं भलत्या मुजोरीला स्थान नाही, मग तो कोणीही असो”, कल्याण मारहाण प्रकरणावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

निवडणुकीच्या तारखा काय असणार?

Maharashtra Assembly Election 2024
२० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी १५ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखांबाबत माहिती दिली. ते म्हणाले होते की, आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसंच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक ( Maharashtra Election 2024 ) तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >> महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा…

२६ नोव्हेंबरच्या आधी पार पडणार निवडणूक

महाराष्ट्र विधानसभेत ( Maharashtra Election 2024 ) एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची ( Maharashtra Election 2024 ) मुदत २६ नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल. महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असंही राजीव कुमार म्हणाले.

Story img Loader