Maharashtra Assembly Election 2024 Date: महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर, निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत काय सांगितलं?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आज दुपारी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024 Date
विधानसभा निवडणुकीमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजेवर गंडांतर आले आहे.

ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तर झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राची विधानसभा संपुष्टात येण्याआधी नवीन विधानसभा गठीत होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि निकाल पूर्ण होईल, असे सांगितले होते.

Election Commission PC Live: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद Live | Maharashtra | Assembly Election

हे वाचा >> Model Code of Conduct in Maharashtra Elections 2024 : आचारसंहितेत काय करता येते, काय करता येत नाही?

निवडणुकीच्या तारखा काय असू शकतात?

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी २८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखांबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसंच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक ( Maharashtra Election 2024 ) तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा >> महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा…

२६ नोव्हेंबरच्या आधी पार पडणार निवडणूक

महाराष्ट्र विधानसभेत ( Maharashtra Election 2024 ) एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची ( Maharashtra Election 2024 ) मुदत २६ नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल. महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असंही राजीव कुमार म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election commission to announce poll dates for maharashtra and jharkhand assembly elections at 3 30 pm today kvg

First published on: 15-10-2024 at 09:03 IST
Show comments