Election : “भाजपाने मतदार याद्यांमधून मविआच्या मतदारांची हजारो नावं…”, महाविकास आघाडीचा आरोप

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत मविआच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

MVA Allegations on BJP
महाविकास आघाडीचा भाजपावर गंभीर आरोप (फोटो-काँग्रेस, एक्स पेज)

Election : भाजपाने मतदार याद्यांमधून हजारो नावं वगळली आहेत असा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि अनिल देसाई यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत या तिन्ही नेत्यांनी भाजपाने केला आहे. निवडणूक ( Election ) पारदर्शी पद्धतीने घेतली गेली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही.असाही आरोप मविआने केला.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

निवडणूक ( Election) आयोगाला आम्ही विनंती केली आहे की राज्याच्या तिजोरीतील पैशांची उधळपट्टी करणं सुरु आहे, त्यावर आळा घालावा. तसंच निवडणुकीच्या मतदानात ( Election) हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या षडयंत्राच्या मागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. चिखली मतदारसंघात मागच्या दहा दिवसांत २६०० नावं क्रमांक सातचे अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर आपोआप नावं कमी केली जात आहेत. मला भाजपाच्या उमेदवाराचं नाव घ्यायचं नाही. मात्र यामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सहभागी आहेत. मविआच्या मतदारांची नावं कमी करण्याचा प्रकार चालला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला ही कल्पना देणार आहोत असं नाना पटोले यांनी सांगितलं.

अनिल देसाई काय म्हणाले?

भाजपाकडून मतदारांची नावं कमी करण्याचा धक्कादायक प्रकार चालला आहे. निवडणूक आयोगाची पथकं आली होती. आम्ही त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस अशा पक्षांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशात मतदारांची नावं कमी करण्याचा आणि खासकरुन महाविकास आघाडीच्या मतदारांची नावं कमी करुन रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छ आणि पारदर्शीपणे निवडणूक ( Election) केली जाईल असं सांगितलं गेलं मात्र याच तत्वाला काळीमा फासला जातो आहे. जो मतदारांचा हक्क आहे तोच हिरावून घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून चालला आहे असा आरोप अनिल देसाई यांनी केला आहे. हा लोकशाहीला काळीमा आहे. निवडणूक आयोगाने त्वरित कठोर पावलं उचलली पाहिजेत असंही अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. आम्ही मतदारांना जागरुक करु इच्छितो की कुणाच्या प्रभावाखाली येऊन मतदान करु नका असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- कोणत्याही महाविकास आघाडीसोबत नाही – राजू शेट्टी

जितेंद्र आव्हाडांचा आरोप काय?

फॉर्म क्रमांक ७ चा वापर करुन प्रत्येक मतदारसंघातून पाच हजार नावं बाजूला काढण्याचा प्रकार महायुतीकडून चालला आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनीही केला. कित्येक ठिकाणी माणसं मृत्यूमुखी दाखवली आहेत आणि ती जिवंत आहेत. गावकऱ्यांनी काही ठिकाणी वगळलेली नावं परत घ्यायला लावली. डिजिटल इंडियाचा नारा दिला जातो आहे आणि अत्यंत वाईट प्रिंट असलेल्या मतदार याद्या छापण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाखाली काम करतो आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. मतदारांची ( Election) यादी जाणीवपूर्वक अशा पद्धतीने छापण्यात आली आहे असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election news mva serious allegation on mahayuti and said we will file the complaint to election commission scj

First published on: 18-10-2024 at 13:37 IST

संबंधित बातम्या