Exit Poll Live Updates, 1 June: महाराष्ट्रात भाजपाने ४५ किंवा त्यापेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तवला होता. तर महाविकास आघाडीने ३० ते ३५ जागा जिंकू असा दावा केला आहे. अशात आता लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी १०० हून अधिक सभा घेतल्या आणि नरेंद्र मोदींनीही प्रत्येक मतदार संघात पाच टप्प्यांमध्ये सभा घेतल्या. आता एबीपी-सी व्होटर्सचा सर्व्हे हे सांगतोय की महाराष्ट्रात चित्र ५०-५० असणार आहे. तसंच भाजपासह महायुतीचं ४५+ जागांचं स्वप्न भंगणार आहे.

काय सांगतो आहे एबीपी आणि सीव्होटर्सचा सर्व्हे

महायुतीला २४ जागा
महाविकास आघाडी २३ जागा
इतर जागा-१

महायुतीबाबत काय सांगतो एबीपी सी व्होटर्स सर्व्हे?

हे पण वाचा- Exit Poll 2024: एक्झिट पोलमध्ये सहभागी न होणाऱ्या काँग्रेसने जाहीर केलं ‘संख्याबळ’, ‘इतक्या’ जागांसह विजयाचा दावा

भाजपा -१७ जागा
शिंदेंची शिवसेना-६
अजित पवारांची राष्ट्रवादी-१
महायुती एकूण -२४ जागा

हे पण वाचा- Exit Poll 2024 Live Update : काँग्रेसला एक्झिट पोल्सचे अंदाज अमान्य; पवन खेरा म्हणाले, “२००४ साली अटल बिहारी वाजपेयींना…”

एबीपी ‘सी व्होटर्सचा’ हा सर्व्हे लक्षात घेतला तर महाराष्ट्रातलं भाजपा आणि महायुतीचं ४५ प्लसचं स्वप्न भंगताना दिसतं आहे. या सर्व्हेतल्या संख्या लक्षात घेतल्या तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊनही भाजपाला फारसा फायदा झालेला दिसत नाही. भाजपाला २०१९ च्या तुलनेत ६ जागा कमी झाल्या आहेत असं हा सर्व्हे सांगतो आहे. तर दुसरीकडे शिवसेना २०१९ मध्ये अखंड होती त्या अखंड शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. त्यातले १३ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. तर त्यांनी यावेळी १५ जागा लढवल्या आहेत. १३ जागांचा विचार केला तर एकनाथ शिंदेंना ७ जागांचं नुकसान होताना दिसतं आहे. राष्ट्रवादीही अखंड होती. त्यांना ४ जागा २०१९ मिळाली होती. अजित पवार २०२४ ला वेगळे झाले आहेत. अशात अजित पवारांना एक जागा एबीपी सी व्होटर्सने दिली आहे. अशात ना नफा ना तोटा असं चित्र अजित पवारांसाठी दिसतं आहे.

महाविकास आघाडीला किती जागा मिळतील एबीपी-सी व्होटर्सचा सर्व्हे?

ठाकरे गट – ९ जागा
शरद पवार गट- ६ जागा
काँग्रेस- ८ जागा
महाविकास आघाडी-२३ जागा
अपक्ष – १ जागा

हे पण वाचा- Maharashtra Exit Poll 2024 : असली-नकलीच्या राजकराणाला महाराष्ट्राची जनता कंटाळली? काय सांगतात एक्झिट पोल

महाविकास आघाडीला एबीपी सी व्होटर्सचा सर्व्हे फायदा होईल हे सांगतो आहे. उद्धव ठाकरेंना ४ जागांचा फायदा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शरद पवारांना २ जागांचा फायदा होईल असं दिसतं आहे. तर काँग्रेसला अवघी एक जागा महाराष्ट्रात २०१९ ला मिळाली होती. त्यांना सात जागांचा फायदा होताना दिसतो आहे.