निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून जवळपास दोन आठवडे झाल्यानंतर काँग्रेसने शनिवारी (२१ ऑक्टोबर) विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. २०० विधानसभा मतदारसंघापैकी पहिल्या यादीत ३३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील पक्ष संघटनेत गटातटाचे राजकारण फोफावले असल्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी वेळ लागल्याचे सांगण्यात येते. पहिल्याच यादीत मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद दोतासरा यांना तिकीट देण्यात आले आहे. ३३ पैकी २९ विद्यमान आमदार आहेत. तर इतर चार उमेदवार २०१८ च्या निवडणुकीत भाजपाकडून पराभूत झाले होते, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

भाजपानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण त्यात केंद्रातील नेत्यांना अधिक स्थान देण्यात आले आहे. तसेच विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राजस्थान भाजपामध्ये खळबळ उडाली आहे. भाजपाने केलेली चूक काँग्रेसने केलेली नाही. पहिल्याच यादीत त्यांनी २९ विद्यमान आमदारांना तिकीट देऊन संभाव्य नाराजी टाळली आहे.

Lok Sabha Congress demanding Deputy Speaker post NDA India Opposition
१८ व्या लोकसभेला उपाध्यक्ष असणार; विरोधकांना पद देण्याची काँग्रेसची मागणी
Abhishek Banarjee
लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप; खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “एकाने जरी…”
om birla loksabha speaker
बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड; कोण आहेत ओम बिर्ला?
Chief Minister Eknath Shinde admits that some mistakes were made by the Grand Alliance in the elections
निवडणुकीत महायुतीकडून काही चुका;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
Lok Sabha Zilla Parishad Chairman to MP Smita Wagh
नव्या लोकसभेचे नवे चेहेरे: जिल्हा परिषद अध्यक्ष ते खासदार…, स्मिता वाघ ,जळगाव, भाजप
Bhaskar Bhagare, dindori lok sabha seat, Sharad Pawar, Sharad Pawar's NCP, Bhaskar Bhagare Defeats BJP s Bharti Pawar, Limited Resources, money, teacher Bhaskar Bhagare, sattakaran article
ओळख नवीन खासदारांची : भास्कर भगरे, (दिंडोरी, राष्ट्रवादी शरद पवार गट) ; सामान्य शिक्षक
bjp absent in meeting of new mps in thane
ठाण्यात नव्या खासदारांच्या बैठकीला भाजपची दांडी
mohan charan majhi
भाजपाकडून पुन्हा एकदा नव्या चेहऱ्याला संधी; मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री!

पहिल्या यादीत पायलट यांच्या निकटवर्तीयांना स्थान देण्यात आल्याचे दिसते. जसे की, इंद्रज गुर्जर, मुकेश भाकर आणि रामनिवास गावरिया यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रत्येकी चार उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.

हे वाचा >> Rajasthan : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच नाराजीनाट्य सुरू; जे. पी. नड्डांचे राज्यात सलग दौरे

रमिला खाडिया या एकमेव विद्यमान अपक्ष आमदार आहेत, ज्यांना काँग्रेसने त्यांच्याच कुशलगड मतदारसंघासाठी उमेदवारी दिली आहे. यावर्षी जून महिन्यात अशोक गहलोत यांनी २०२० साली काँग्रेसचे सरकार वाचविण्यात रमिला खाडिया यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे सांगितले. गहलोत म्हणाले की, त्यांच्या गाडीत विरोधकांनी पैसे भरून ठेवले होते, तरीही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही.

मुख्यमंत्री अशोक गहलोत सरदारपुरा या त्यांच्या मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार आहेत. तर टोंक येथून सचिन पायलट, लक्ष्मणगडमधून दोतसरा आणि नाथद्वार येथून सीपी जोशी निवडणूक लढविणार आहेत. कॅबिनेट मंत्री ममता भूपेश यांना सिकराय येथून पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर त्यांचे सहकारी टीकाराम जूली यांना अलवर ग्रामीण आणि महेंद्र जीत सिंह मालवीय यांना बागीडोरा येथून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. राज्यमंत्री भनवर सिंह भाटी यांना कोलायत आणि अशोक चंदना यांना हिंदोली येथून पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

विद्यमान आमदारांपैकी ऑलम्पिक पदक विजेत्या डॉ. क्रिष्णा पुनिया (सदुलपूर), गणेश घोगरा (डुंगरपूर); मनोजकुमार मेघवाल (सुजानगड); रिटा चौधरी (मांडवा); इंद्रज सिंग (विराटनगर); दानिश अबरार (सवाई माधोपूर); मुकेश भाकर (लाडनू); चेतन सिंह चौधरी (दिडवाना); मंजू देवी (जयाल); विजयपाल मिर्धा (देगाणा); रामनिवास गवरिया (पर्बतसर); दिव्या मदेर्ना (ओशियन); मनीषा पनवार (जोधपूर); महेंद्र बिश्नोई (लुनी); हरीश चौधरी (बायटू) आणि प्रिती गजेंद्र सिंह शक्तावत (वल्लभनगर) यांना त्यांच्या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेले आहे.

२०१८ साली पराभूत झालेल्या मतदारसंघापैकी ललीत कुमार यादव हे बसपाचे माजी आमदार यांना मुंडावर येथून पुन्हा काँग्रेसच्या तिकीटावर संधी देण्यात आली आहे. मागच्यावेळी भाजपाचे मंजीत धरमपाल यांनी त्यांचा पराभव केला होता. अर्चना शर्मा यांना पुन्हा एकदा मालवीय नगर, पुष्पेंद्र भारद्वाज यांना संगनेर आणि विवेक धाकर यांना मंडलगड येथून उमेदवारी देण्यात आली आहे.