Uddhav Thackeray First List : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा हुकमी एक्का!

एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडीमधून उद्धव ठाकरे यांनी हुकमी एक्का उभा केला आहे.

Uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार (फोटो – संग्रहित छायाचित्र)

Uddhav Thackeray First List : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार हा प्रश्न होता. या प्रश्नावर उत्तरे मिळाली असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का दिला आहे.

डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतून एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Kavathe Mahankal Assembly constituency
अजित पवारांच्या खेळीमुळे आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटलांसमोर तगडे आव्हान
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Devendra Fadnavis on Assembly Election 2024
Rahul Narwekar : भाजपाने मुंबईतील पहिली बंडखोरी रोखली; पक्षातील नाराजी नाट्यावर अखेर पडदा!
MNS First List of Candidates
MNS Candidate 1st List : राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर, राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा!
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
Bigg Boss Marathi Winner : ‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!
Zeeshan Siddique Meets Devendra Fadnavis
Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर, राजकीय वर्तुळात ‘या’ चर्चांना उधाण
Eknath Shinde and shilpa bodkhe resign
Shilpa Bodkhe : आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, आता शिंदेंच्या शिवसेनेलाही रामराम; ‘या’ महिला नेत्याची आठ महिन्यांत शिवसेनेला सोडचिठ्ठी!
Maha Vikas Aghadi finalises seat sharing for Maharashtra
अखेर मविआचे ठरले! काँग्रेस १०५, ठाकरे ९५, शरद पवार ८५

हेही वाचा >> MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला! काँग्रेस, ठाकरे अन् पवारांचा सेफ गेम; २८८ जागांचा फॉर्म्युला काय?

u

एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार निवडणूक

२००९ पासून कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आमदार आहेत. परंतु, २०२२ मध्ये झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन प्रमुख गट पडले. त्यामुळे एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. याच जागेवरून उद्धव ठाकरे यांनी हुक्कमी एक्का उभा केला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
चाळीसगावउन्मेश पाटील
पाचोरावैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा)सिध्दार्थ खरात
बाळापूरनितीन देशमुख
अकोला पूर्वगोपाल दातकर
वाशिम (अजा)डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरासुनील खराटे
रामटेकविशाल बरबटे
वणीसंजय देरकर
लोहाएकनाथ पवार
कळमनुरीडॉ. संतोष टारफे
परभणीडॉ. राहुल पाटील
गंगाखेडविशाल कदम
सिल्लोडसुरेश बनकर
कन्नडउदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्यकिशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा)राजु शिंदे
वैजापूरदिनेश परदेशी
नांदगांवगणेश धात्रक
मालेगांव बाह्यअद्वय हिरे
नाशिक मध्यवसंत गीते
नाशिक पश्चिमसुधाकर बडगुजर
पालघर (अज)जयेंद्र दुबळा
बोईसर (अज)डॉ. विश्वास वळवी
निफाडअनिल कदम
भिवंडी ग्रामीण (अज)महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा)राजेश वानखेडे
डोंबिवलीदिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीणसुभाष भोईर
ओवळा माजिवडानरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडीकेदार दिघे
ठाणेराजन विचारे
ऐरोलीएम.के. मढवी
मागाठाणेउदेश पाटेकर
विक्रोळीसुनील राऊत
भांडुप पश्चिमरमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर
दिंडोशीसुनील प्रभू
गोरेगांवसमीर देसाई
अंधेरी पूर्वऋतुजा लटके
चेंबूरप्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा)प्रविणा मोरजकर
कलीनासंजय पोतनीस
वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई
माहिममहेश सावंत
वरळीआदित्य ठाकरे
कर्जतनितीन सावंत
उरणमनोहर भोईर
महाडस्नेहल जगताप
नेवासाशंकरराव गडाख
गेवराईबदामराव पंडीत
धाराशिवकैलास पाटील
परांडाराहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शीदिलीप सोपल
सोलापूर दक्षिणअमर रतिकांत पाटील
सांगोलेदिपक आबा साळुंखे
पाटणहर्षद कदम
दापोलीसंजय कदम
गुहागरभास्कर जाधव
रत्नागिरीसुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूरराजन साळवी
कुडाळवैभव नाईक
सावंतवाडीराजन तेली
राधानगरीके. पी. पाटील
शाहूवाडीसत्यजीत आबा पाटील
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची पहिली यादी

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने ६५ जागांवर उमेदवार जाहीर केले असून उर्वरित २० जागांची प्रतिक्षा आहे. दरम्यान, जाहीर केलेल्या जागांमध्ये काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे, असं शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First candidates list of shivsena uddhav balasaheb thackeray release who is agaisnt of eknath shinde sgk

First published on: 23-10-2024 at 18:52 IST

संबंधित बातम्या