लोकसभा निवडणुकीकरता जागावाटपाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे. त्यामुळे कोणाला कोणत्या जागेवरून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, काँग्रेसने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातून सात जणांना संधी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत ५७ जणांची यादी जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजीराव काळगे, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज, नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी, अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे, नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण, पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. या आघाडीत अनेक पक्ष सामील असल्याने कोणाच्या वाट्याला किती जागा येतात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नसला तरीही काँग्रेसने अधिकृतरित्या त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First list announced by congress for lok sabha chance for this candidates in seven seats in maharashtra who will contest from pune sgk