Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis Sanjay Raut Meet : देवेंद्र फडणवीस यांना अनाजीपंत महाराष्ट्राचं राजकारण बिघवणारे नेते म्हणून टीका करणारे संजय राऊत यांचा आणि संजय राऊत यांना महत्त्व देत नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो म्हणजे फोटो ऑफ द डे आहे असं देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि संजय राऊत यांची मुलाखत होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान हे दोन्ही नेते भेटले आणि सदिच्छा भेट झाली. त्यामुळे या फोटो ऑफ द डे ची चर्चा रंगली आहे. ज्या दोन नेत्यांच्या मधून एरवी विस्तवही जात नाही असे दोन नेते म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस. ते जेव्हा एकमेकांना हसत खेळत भेटतात आणि हस्तांदोलन करतात तेव्हा चर्चा तर होणारच.

संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना काय काय म्हणाले आहेत?

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण बिघडवलं. अत्यंत घाणेरड्या पातळीवर त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणून ठेवलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत. देवेंद्र फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाटणारं प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे, राजकीय प्रेम आहे. सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना विदर्भ वेगळा करायचा होता. त्यासाठी त्यांनी लग्न न करण्याचा निर्धार केला होता. अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. शिवाय याआधीही संजय राऊत यांनी अनेकदा याच प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. तर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कायमच राजकारणात माझा स्तर ठेवा असं म्हणत त्यांच्याविषयी उत्तर देणं टाळलं आहे.

Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी काय म्हणाले होते?

“संजय राऊत यांच्यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका. जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात मी त्यांच्यावर बोलत नाही. संजय राऊत लंडनमध्ये आहेत असं कळलं तिकडे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. योग्य औषध त्यांनी घ्यावं.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस हे कायमच संजय राऊत यांच्याबाबत मला प्रश्नच विचारु नका असं म्हणत आहेत. राजकारणात माझा स्तर जरा ठेवा असं देवेंद्र फडणवीस कायमच म्हणत असतात.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “जिहाद हा शब्दच हिंदुत्वात नाही, जर असं काही..”, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाइड स्टोरी काय?

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचार सुरू आहे. सरकारकडून विविध योजना, विकासकामं जनतेपर्यंत पोहचवली जात आहेत. तर विरोधक सरकार कुठल्या पातळ्यांवर कमी पडलं ते सांगत आहेत. एनडीटीव्ही मराठीच्या जाहीरनामा या कॉनक्लेव्हच्या दरम्यान खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही क्षणांसाठी भेट झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी संजय राऊत यांच्याशी हस्तांदोलन केलं. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) संजय राऊतांना म्हणाले, आजचा हा फोटो म्हणजे फोटो ऑफ द डे आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की तेवढा तर आलाच पाहिजे. यानंतर दोघंही मनमुरादपणे हसले आणि दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करुन निरोप घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय विरोधकांनाही हसतमुखाने भेटण्याची परंपरा आहे ही संस्कृती यशवंतराव चव्हाण यांच्यापासून चालत आली आहे. ती आपणही टिकवली आहे हेच जणू काही हा फोटो सांगतो आहे.

Story img Loader