Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis Sanjay Raut Meet : देवेंद्र फडणवीस यांना अनाजीपंत महाराष्ट्राचं राजकारण बिघवणारे नेते म्हणून टीका करणारे संजय राऊत यांचा आणि संजय राऊत यांना महत्त्व देत नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो म्हणजे फोटो ऑफ द डे आहे असं देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि संजय राऊत यांची मुलाखत होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान हे दोन्ही नेते भेटले आणि सदिच्छा भेट झाली. त्यामुळे या फोटो ऑफ द डे ची चर्चा रंगली आहे. ज्या दोन नेत्यांच्या मधून एरवी विस्तवही जात नाही असे दोन नेते म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस. ते जेव्हा एकमेकांना हसत खेळत भेटतात आणि हस्तांदोलन करतात तेव्हा चर्चा तर होणारच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा