लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सर्व उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (६ मे) मतदान होणार आहे, चौथ्या टप्प्यात १४ मे आणि पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात ज्या-ज्या ठिकाणी मतदान होणार आहे तिथल्या उमेदवारांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू केला आहे. अशातच महाविकास आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांना प्रचारावेळी एक वाईट अनुभव आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाव केला आहे की, मुंबईच्या घाटकोपरमधील एका गुजरातीबहुल सोसायटीमधील काही गुजराती रहिवाशांनी त्यांना संजय दिना पाटील यांचा प्रचार करण्यापासून रोखलं आहे. संजय दिना पाटील हे केवळ मराठी उमेदवार आहेत म्हणून आम्हाला प्रचार करण्यापासून रोखलं अशी तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. यावर ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर भाष्य करताना राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा