तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता भाजपात परतणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपात परतणार असल्याची चर्चा चालू होती. अशातच खडसे यांनी गेल्या आठवड्यात स्वतःच भाजपात परतणार असल्याची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, भाजपामध्ये येण्याचा माझा प्रयत्न नव्हता, किंवा तसा विचार नव्हता. परंतु, भारतीय जनता पक्षातील माझे जे जुने सहकारी, कार्यकर्ते आणि नेते म्हणायचे की तुम्ही आत्ता भाजपात असायला हवे होतात. तुम्ही स्वगृही परत यायला हवं, तस झाल्यास बरं होईल. गेल्या चार-सहा महिन्यांपासून याबाबत चर्चा चालू होती. परंतु, माझ्या राजकीय परिस्थितीनुसार मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. आता पक्षातील केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करून ते सांगतील त्या तारखेला मी दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश करणार आहे. खडसे यांनी भाजपात जाण्याची घोषणा करून अनेक दिवस लोटले आहेत. अद्याप त्यांचा भाजपा प्रवेश झालेला नाही. पक्षश्रेष्ठींनी खडसेंना वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे खडसे आणि त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा