Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत जातेय. मतमोजणीदरम्यान होणाऱ्या आकडेवारीचा आलेख कमी जास्त होत असला तरीही दुपारच्या सत्रात आता चित्र जवळपास स्पष्ट होतंय. मुंबईतील सहा मतदारसंघ हे दोन्ही शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची चांगली कामगिरी दिसू येतेय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार ठाकरे गटाने सर्व ४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, शिंदे गटाच्या मुंबईतील सर्व जागा पिछाडीवर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील चार जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडल्या होत्या. त्या सर्व जागांवर ठाकरे गट आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दीना पाटीलआघाडीवर असून त्यांना २ लाख ८० हजार ७१ मते आतापर्यंत मिळाली आहेत. तर भाजपाचे मिहिर कोटेचा २३ हजार २१८ मतांनी पिछाडीवर आहेत.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत २ लाख २९ हजार ५०९ मते मिळाली आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांनीही चांगली आघाडी घेतली आहे. त्यांना २ लाख १२ हजार ७२९ मते मिळाली असून शिंदे गटाच्या यामिनी जाधव या ६१ हजार ७९४ मतांनी पिछाडीवर आहेत. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांना ३ लाख ४० हजार ९३२ मते आतापर्यंत मिळाली असून राहुल शेवाळे ४८ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.cgxyRlrn

हेही वाचा >> Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मुंबईतील निकालांची स्थिती काय? कोण किती जागांवर आघाडीवर?

महाराष्ट्रात किती टक्के मतदान

राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. १९ मे रोजी पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६३.७१ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडला. या दिवशी , बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या दुसऱ्या टप्प्यात ६२.७२ टक्के मतदान झाले. तिसरा टप्पा सात मे रोजी झाला असून रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघात ६३.५५ टक्के मतदारांनी मतदान केले. १३ मे रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या मतदारसंघांमध्ये एकूण ६२.२१ टक्के मतदारांनी मतदान केले. तर २० मे रोजी शेवटच्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान झाले. यावेळी ५६.८९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giving a tough fight to the shinde group all thackerays shilledars are leading in mumbai seats ubts victory in a tough fight sgk
Show comments