2024 Lok Sabha Election Result Goa Belgaum Telangana Vote Counting Highlights: लोकसभा निवडणुकांचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला असताना, कोण जिंकणार व कोण हरणार याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे. लोकसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाला किती जागा मिळणार, याबाबत सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Live Updates

Lok Sabha Election Results 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल; पाहा कोण बाजी मारणार

14:20 (IST) 4 Jun 2024
Telangana Lok Sabha Election 2024 Result Live Updates: जी. किशन रेड्डी सिकंदराबादमध्ये आघाडीवर

सिकंदराबादमध्ये भाजपचे जी. किशन रेड्डी आघाडीवर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार त्यांना ३७७१८९ मते मिळाली आहेत.

14:08 (IST) 4 Jun 2024
Belgaum, Karnataka Lok Sabha Election Results 2024 Live Updates: भाजपाचे जगदीश शेट्टर आघाडीवर

बेळगाव मतदारसंघातून भाजपाचे जगदीश शेट्टर सध्या २४२८९५ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या मृणाल हेब्बाळकर १९७२७९ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

14:00 (IST) 4 Jun 2024
Telangana Lok Sabha Election Results 2024 Live: भाजपाच्या माधवी कोम्पेला पिछाडीवर

हैद्राबाद मतदारसंघात एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी सध्या २३६०८० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाच्या माधवी कोम्पेला १८१६६७ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

13:37 (IST) 4 Jun 2024
Telangana Election Results 2024 Live: तेलंगणात काँग्रेस, भाजपा बरोबरी

तेलंगणात काँग्रेस, भाजपा बरोबरी, तर बीआरएस आघाडी मिळविण्यात अपयशी ठरली असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

13:31 (IST) 4 Jun 2024
South Goa, Goa Lok Sabha Election Results 2024 Live Updates: विरियाटो फर्नांडिस आघाडीवर

दक्षिण गोवा मतदार संघातून काँग्रेसचे विरियाटो फर्नांडिस आघाडीवर आहेत.

12:46 (IST) 4 Jun 2024
Telangana Election Results 2024 LIVE: वारंगलमध्ये कादियम काव्या आघाडीवर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कादियम काव्या सध्या ३०८२२६ मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपाचे अरोरी रमेश २०२००७ मतांनी पिछाडीवर आहेत.

12:16 (IST) 4 Jun 2024
Telangana Lok Sabha Election 2024 Result Live Updates: हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवैसी आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी १९३०३८ मतांनी आघाडी कायम ठेवली आहे तर भाजपच्या माधबी लता १४८२६० मतांनी पिछाडीवर आहेत.

11:41 (IST) 4 Jun 2024
Goa Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उत्तर आणि दक्षिण गोव्यात पाहा कोण आघाडीवर?

उत्तर गोवा

भाजपा - श्रीपाद नाईक- १४१७८९

काँग्रेस - ॲड रमाकांत खलप - ७८८३

दक्षिण गोवा

काँग्रेस - विरियातो फर्नांडीझ -१३७२४४

भाजपा - पल्लवी धेंपो - १२५२४२

11:34 (IST) 4 Jun 2024
Belgaum Lok Sabha Result 2024: बेळगाव लोकसभा निकालाची घटिका समिप आली

बेळगाव लोकसभा जागेसाठी २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान पार पाडले असून भारतीय जनता पक्षाच्या अंगडी सुरेश चन्नाबसप्पा यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ६३.२ टक्के मते मिळवून आपली जागा कायम ठेवली. चन्नाबसप्पा यांनी काँग्रेसच्या साधुनावर यांच्यावर विजय मिळवला होता.

10:18 (IST) 4 Jun 2024
2024 Lok Sabha Election Result Telangana Vote Counting Live Updates: भाजपावर काँग्रेसची कुरघोडी, तेलंगणात काँग्रेस आघाडीवर तर ओवैसी पिछाडीवर

दक्षिण भारतातील तेलंगणात राज्यात भाजपाने मुसंडी मारली होती परंतु आता काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. एकुण १७ जागा असलेल्या या राज्यात भाजपा ७ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर आहे. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. तेलंगणा राज्यात काँग्रेसची सरकार आहे. हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसी पिछाडीवर असून भाजपाच्या माधवी लता आघाडीवर आहे.

२०१९ लोकसभा मध्ये तेलंगणात भारत राष्ट्र समितीला ९, भाजपा ४, काँग्रेस ३ आणि एआयएमआयएम १ इतक्या जागा मिळाल्या होत्या.

09:58 (IST) 4 Jun 2024
Goa Lok Sabha Election 2024 Result Live Updates: २०१९ मध्ये भाजपा विजयी

२०१९ च्या उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे श्रीपाद येसो नाईक उत्तर गोवा मतदारसंघातून विजयी झाले होते. आता यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

09:38 (IST) 4 Jun 2024
Goa Lok Sabha Election 2024 Result Live Updates: काही तासातच गोव्याचे खासदार ठरणार

गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाची (भाजपा) काँग्रेसशी थेट स्पर्धा आहे. मात्र, सध्या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी एक जागा आहे. देशभरात सात टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांतच आपल्या हाती येणार आहेत.

08:59 (IST) 4 Jun 2024
Goa Lok Sabha Election 2024 Result Live Updates: गोव्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात

राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण देशात कोणाची सत्ता येणार हे ठरवणारा आजचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गोव्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Goa Lok Sabha Election Results 2024

Story img Loader