Premium

राहुल गांधींना ‘मोदी-फोबिया’ झालाय – अमित शाह

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा उमेदवार रवी नाईक यांच्या प्रचारासाठी अमित शाह हे गोव्यात आले होते. नाईक यांनी नुकतंच काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

राहुल गांधींना ‘मोदी-फोबिया’ झालाय – अमित शाह

देशातल्या पाच राज्यांमध्ये आता विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष मैदानात उतरले असून विरोधकांवर टीका करण्याचं सत्र सुरू आहे. त्याच निमित्ताने गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारासाठी आले असून त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींना मोदी फोबिया झाला आहे, अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे.

गोव्यातल्या पोंडा इथं बोलताना अमित शाह म्हणाले, “भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे. भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. की माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या विकासासाठी काहीही केलं नाही. भाजपाने मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचं कौतुकही केलं. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंतजी, मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत”.

Bhandara, Congress-Pawar group Bhandara,
भंडारा : चरण वाघमारेंच्या ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस-पवार गटाचे नेते आक्रमक; सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Harshvardhan Patil in possession of Indapur Congress Bhawan
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा?
Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan iftar party
Baba Siddiqui Murder: सामान्य कार्यकर्ता ते मंत्री, बॉलीवूडमध्येही चलती; बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास कसा होता?
bjp unexpected hat trick in haryana assembly election
विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?
Chirag Paswan
Chirag Paswan : उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसला नवं आव्हान; चिराग पासवान यांनी आखली मोठी योजना
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Congress leaders in Nagpur claimed that state president Nana Patole will be the next chief minister
“पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच,” काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर…

हेही वाचा – “गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण” ; अमित शाहांचे काँग्रेसवर ताशेरे

अमित शाह यांनी या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी यांना मोदी फोबिया झाला आहे अशी टीका अमित शाह यांनी केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा उमेदवार रवी नाईक यांच्या प्रचारासाठी अमित शाह हे गोव्यात आले होते. नाईक यांनी नुकतंच काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मोदी सरकारने छोट्या राज्यांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलं असून किनारी प्रदेशातल्या राज्यांसाठी लागेल ती मदत केल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goa elections 2022 amit shah rahul gandhi is suffering from modi phobia vsk

First published on: 30-01-2022 at 19:47 IST

संबंधित बातम्या