शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. शिवसेना ठाकरे गटातील आक्रमक नेत्यांपैकी एक भास्कर जाधव आहेत. भास्कर जाधव यांची गुहागर विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. महाविकास आघाडीत गुहागरची जागा ठाकरे गटाला मिळाल्यानंतर भास्कर जाधव यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर महायुतीमध्ये गुहागरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास
भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. चिपळून विधानसभा मतदारसंघातून १९९५ व १९९९ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४ मध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यावेळी नाराज झालेल्या जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व २००४ मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.
हेही वाचा : Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत
शिवसेना सोडल्यानंतर भास्कर जाधव यांनी वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून ते सलग दोन वेळा म्हणजेच २००९ व २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले. २०१९ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली. राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत जाधव यांचे संबंध ताणले जात होते, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत घरवापसी केल्याचे म्हटले जाते. सध्या भास्कर जाधव हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असून ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना ७४६२६ मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गुहागरमधून ४७०३० मते मिळाली. अनंत गितेंना २७५९६ मते अधिक मिळाली. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार भास्कर जाधव यांची चांगली पकड आहे.
हेही वाचा : Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?
महायुतीकडून राजेश बेंडल यांना उमेदवारी
गुहागर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तयारी सुरू केली होती. दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. तसेच संभाव्य उमेदवार म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचे नाव यापूर्वी समोर आले होते. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून विनय नातू उमेदवार असणार की, सदानंद चव्हाण याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती. परंतु, विनय नातू यांच्याशी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक यांनी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर या मतदारसंघातून राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गुहागरमध्ये शिवसेना (ठाकरे) विरूद्ध शिवसेना (शिंदे) अशी लढत पाहण्यास मिळाली.
भास्कर जाधवांनी गुहागरचा गड राखला
गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या २ हजार ५९२ मतांनी निसटता पराभव झाला. आमदार भास्कर जाधव यांनी ७१ हजार २४१ मते घेऊन गुहागरचा गड राखण्यात यश मिळविले. गुहागर विधानसभा मतदारसंघात यावेळची लढत अतिशय रंगतदार होणार हे चित्र मतदानापूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र सलग तीन टर्म निवडून आलेले भास्कर जाधव यावेळी देखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज काहींना होता. भास्कर जाधव यांनीदेखील आपण ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ असा मोठा आत्मविश्वास व्यक्त केला होता.
अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राजेश बेंडल यांनी भास्कर जाधव यांचे मताधिक्य अवघ्या अडीच हजारावर आणले. यावरूनच त्यांच्याबद्दल येथील मतदार व जनतेत असलेली नाराजी मतपेटीतून स्पष्टपणे समोर आली आहे. त्यामुळे या पराभवा देखील राजेश बेंडल यांचा आणि येथील जनतेचा नैतिक विजय झाल्याचे आता बोलले जात आहे. या निवडणुकीत भास्कर जाधव यांना ७२ हजार २४१, राजेश बेंडल यांना ६८ हजार ४११, मनसेचे प्रमोद गांधी यांना ६ हजार ७१२, अपक्ष सुनील जाधव यांना १ हजार ७६१, प्रमोद आंब्रे यांना ९६५, अपक्ष मोहन पवार यांना ७६७, अपक्ष सन्दीप फडकले यांना ४३३ तर नोटाला १ हजार १९७ एवढी मते मिळाली.
र
२०१४ व २०१९ ची गुहागर विधानसभा निवडणूक
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. भाजपाचे उमेदवार डॉ. विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना ७२५२५ मते, तर भाजपाच्या डॉ. नातू यांना ३९७६१ व शिवसेनेच्या विजयकुमार भोसलेंना ३२०८३ मते मिळाली होती. भास्कर जाधव यांनी ३२००० हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.
२०१९ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवून जिंकली होती. या निवडणुकीत जाधव यांना ७८७४८ मते, तर राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांना ५२२९७ मते मिळाली होती.
भास्कर जाधवांकडून मुलाच्या उमेदवारीसाठी दबावतंत्राचा वापर
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०२४ ची विधानसभा निवडणूक पुत्र विक्रांत जाधव यांना गुहागर मधून लढवता यावी, यासाठी भास्कर जाधव यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मुलाला गुहागरमधून तर स्वत: चिपळूण मधून निवडणूक लढवण्यासाठी भास्कर जाधव हे प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना साद देत एका मेळाव्याचेही आयोजन केले होते. तसेच दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
२००८ नंतर रायगड लोकसभेचा भाग
रायगड लोकसभेचा एक भाग असलेला गुहागर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना, भाजपचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. २००८ मध्ये लोकसभा मतदारसंघांची फेरमांडणी होण्याआधी गुहागर विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होता. फेरमांडणी झाल्यानंतर हा मतदारसंघ आता रायगड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात गुहागर, पेन, अलिबाग, श्रीवर्धन, महाड व दापोली हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
हापूस आंबा, काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध
हापूस आंबा, काजू, सुपारी यांचे उत्पादन गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणात होते. दाभोळ वीज प्रकल्पानंतर गुहागरला आर्थिक चालना मिळाली. गुहागरमधील नारळ कोकणात प्रसिद्ध आहे. गुहागर हे दुर्गादेवी मंदिर व श्री व्याडेश्वर मंदिरामुळे देखील प्रसिद्ध आहे.