Gujarat Exit polls Updates, 8 December 2022 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त १६ ते २० जागांवर विजय मिळण्याती शक्यता आहे. दुसरीकडे आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणंही कठीण आहे. बहुमतासाठी ९२ जागा जिंकणं आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या निवडणुकीत भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा तसंच काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला होता.

एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपाला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज होता.

Live Updates

Gujarat Assembly Election Result 2022 Live Counting Updates : गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय, काँग्रेसचा रेकॉर्ड काढला मोडीत

19:59 (IST) 8 Dec 2022
भाजपाचे समर्थन वाढल्याने परिवारवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रोश वाढला – पंतप्रधान मोदी

देशाच्या हितासाठी सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपात असल्याने लोकांनी भाजपाला मतदान केलं आहे. भाजपाचे समर्थन वाढल्याने परिवारवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रोश वाढत आहे, असेही ते म्हणाले.

19:43 (IST) 8 Dec 2022
भाजपा आदिवासी बांधवाना सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील – पंतप्रधान मोदी

भाजपा आदिवासी बांधवाना सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच आज देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

19:41 (IST) 8 Dec 2022
हिमाचल प्रदेशमध्ये विकासासाठी वचनबद्ध – पंतप्रधान मोदी

हिमाचलमध्ये भाजपला एक टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतांनी सत्तेपासून वंचित ठेवले असले, तरी विकासासाठी आमची वचनबद्धता 100 टक्के असेल, अशी ग्वाही देतो, असेही ते म्हणाले.

19:37 (IST) 8 Dec 2022
भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर देशातील युवकांचा विश्वास – पंतप्रधान मोदी

केवळ घोषणेसाठी आम्ही घोषणा करत नाही. त्यामागे दृरदृष्टी असते. भाजपाने अनेक चढउतार बघितले. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर देशातील युवकांचा विश्वास आहे. आम्ही जातीपातीच्या आधारे राजकारण करत नाही, अशी प्रतिक्रियाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

19:23 (IST) 8 Dec 2022
आजच्या विजयातून पुढच्या काळातील चित्र स्पष्ट – पंतप्रधान मोदी

गुजरातमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेने आभार मानले आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच हा विजय शक्य झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आजच्या विजयातून पुढच्या काळातील चित्र स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

19:07 (IST) 8 Dec 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी बीजेपी मुख्यालयात दाखल

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पोहोचून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

17:59 (IST) 8 Dec 2022
अजित पवारांची भाजपावर टीका

हिमाचल प्रदेश भाजपाध्यक्ष जे पी नड्डांचं राज्य असून तेच त्यांना टिकवता आलेलं नाही अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

17:45 (IST) 8 Dec 2022
कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य नव्हता – नरेंद्र मोदी

गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. “मला गुजरातमधील सर्व मेहनती कार्यकर्त्यांना तुम्ही चॅम्पियन आहात असं सांगायचं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य नव्हता. हे कार्यकर्ताच पक्षाची खरी ताकद आहे,” असं नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

17:05 (IST) 8 Dec 2022
आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता, केजरीवालांनी मानले आभार

आम आदमी पक्षाला स्थापनेनंतर १० वर्षातच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत. गुजरातमधील जनतेने आपला राष्ट्रीय पक्ष बनवलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

देशात फार कमी पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असून, आता त्यात आपचाही समावेश झाला असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.

“आपचं दोन राज्यात सरकार असून आज तो राष्ट्रीय पक्ष झाला आहे हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटतं. गुजरातमधील जनतेने दिलेलं प्रेम, सन्मान याबद्दल मी आभारी आहे. मला फार काही शिकायला मिळालं आहे. गुजरात भाजपाचा गड मानला जात असून तो भेदण्यात आम्हाला यश मिळालं आहे. पुढील वेळी तो जिंकू,” असं केजरीवाल म्हणाले आहेत.

16:38 (IST) 8 Dec 2022
काँग्रेसची मतं फुटण्यासाठी भाजपाने आपला निधी पुरवला, सिद्धरमय्या यांचा गंभीर आरोप

गुजरातमधील निकालानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसची मतं फोडण्यासाठी भाजपाने आपला निधी पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“गुजरातमध्ये आपने खूप पैसा खर्च केला आहे. माझ्या माहितीनुसार, काँग्रेसची मतं फोडण्यासाठी भाजपाने आपला पैसा पुरवला आहे. आपने निवडणूक जिंकल्याने आम्ही मागे पडलो आहोत,” असं सिद्धरमय्या म्हणाले आहेत.

16:07 (IST) 8 Dec 2022
उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपाचं अभिनंदन

गुजरातमधील विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली, त्यामुळे जनतेनं भाजपाला भरघोस मतदान केलं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

“आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचं त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असतं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

15:37 (IST) 8 Dec 2022
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास”

“भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

15:30 (IST) 8 Dec 2022
गुजरातचा विकास फक्त भाजपाच करु शकतो – देवेंद्र फडणवीस

आम आदमी पक्ष दिल्लीपुरता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गुजरातचा विकास फक्त भाजपाच करु शकतो हेदेखील सिद्ध झालं आहे. प्रचारासाठी गेलो होतो तेव्हाच गुजरातचा मूड दिसत होता. प्रत्येक ठिकाणी मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

14:48 (IST) 8 Dec 2022
Gujarat Election Results 2022 : भाजपा उमेदवार रिवाबा जडेजा यांचा रोडशो

जामनगरमधील भाजपाच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्या ५० हजारापेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे. दरम्यान, त्यांनी जामनगर येथे रोड शो काढत जनतेचे आभार मानले.

14:16 (IST) 8 Dec 2022
गुजरातमधील विजयानंतर अमित शाह यांचं ट्वीट

“गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले,” असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

14:06 (IST) 8 Dec 2022
भाजपाच्या ऐतिहासिक विजयामागे मोदींचं व्हिजन – चंद्रकांत पाटील

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनमुळे हा विजय मिळाला आहे. भाजपावर विश्वास टाकल्याबद्दल मला राज्याच्या जनतेचे आभार मानायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करु असं आश्वासन आम्ही देतो. विरोधकांनी दिलेली निराधार आश्वासनं आणि तसंच मूर्ख बनवत केलेल्या खोट्या विधानांवर विश्वास न ठेवल्याबद्दली मी जनतेचे आभार मानतो,” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

13:36 (IST) 8 Dec 2022
रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाचा विजय

भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी आणि भाजपाची उमेदवार रिवाबाचा जामनगरमधून विजय झाला आहे. “ज्यांनी मला उमेदवार म्हणून स्वीकारलं, माझ्यासाठी काम केलं, जोडले गेले त्या सर्वांचे मी आभार मानते. हा फक्त माझा नवे तर भाजपाचा विजय आहे,” असं रिवाबाने सांगितलं आहे.

13:28 (IST) 8 Dec 2022
गुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पंतप्रधान मोदी…”

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, निकालात भाजपाला मोठं यश मिळताना दिसत आहे. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमी…

13:28 (IST) 8 Dec 2022
भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

13:15 (IST) 8 Dec 2022
मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं सेलिब्रेशन

गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु असल्याने मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी गांधीनगरमधील भाजपा मुख्यालयात जल्लोष करत आनंद व्यक्त केला. (Express Photos by Nirmal Harindran)

13:09 (IST) 8 Dec 2022
रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाची प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा जामनगरमधून आघाडीवर आहे. “भाजपाने गेल्या २७ वर्षांमध्ये ज्याप्रकारे काम केलं आहे आणि गुजरात मॉडेलची स्थापन केलं आहे ते पाहता जनतेने भाजपासहितच विकासाचा प्रवास पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात नेहमीच भाजपाच्या पाठीशी राहिला असून, यापुढेही राहील,” असा विश्वास रिवाबाने व्यक्त केला आहे.

12:41 (IST) 8 Dec 2022
Gujarat Election Results: गुजरातमध्ये भाजपाची सरशी, महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष!

गांधीनगरमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गुजरातमधील निवडणुकांतील मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना नाचून विजयाचा आनंद साजरा केला. हाती येणाऱ्या निकलानुसार भाजप 182 पैकी 152 जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्ते जल्लोषात असल्याचे पाहायला मिळते आहे.

12:23 (IST) 8 Dec 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सी आर पाटील यांचं अभिनंदन

गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. सी आर पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने गुजरातमधील निवडणूक लढली असून, रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

12:20 (IST) 8 Dec 2022
हा निकाल धक्कादायक आहे, गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं विधान

गुजरातमधील निकाल धक्कादायक असल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी केलं आहे. “गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सरकारला आणण्याचा जनतेचा निर्णय धक्कादायक आहे. निकाल पाहता आम्ही कोणत्याही बाजूने कमी पडलेलो नाही,” असं जगदीश ठाकूर म्हणाले आहेत.

“आम्ही चांगला लढा दिला आहे. पण तरीही आम्ही सरकार स्थापन करु शकलेलो नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पराभवाचं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “यावर आम्ही चर्चा करु. विजय किंवा पराभवाची एक, दोन कारणं नाही आहेत. तसंच भाजपासंबंधी प्रेम आहे असंही नाही”.

12:11 (IST) 8 Dec 2022
१० किंवा ११ डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता

गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाची सत्ता येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. १० ते ११ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीसाठी हजर राहणार आहेत.

12:03 (IST) 8 Dec 2022
रवींद्र जाडेजाची पत्नी जामनगरमधून आघाडीवर

भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा भाजपाकडून निवडणूक लढवत असून सध्या आघाडीवर आहे. भाजपाने रिवाबाला जामनगरमधून उमेदवारी दिली आहे. रिवाबा सध्या १८ हजार ९८१ मतांनी आघाडीवर आहे.

12:00 (IST) 8 Dec 2022
गुजरातमध्ये आम्ही खातं उघडलं तरी आम्हाला आनंद होईल- प्रीती मेनन

11:59 (IST) 8 Dec 2022
आपनं दिल्ली घेतली, गुजरात भाजपाला सोडलं- संजय राऊत

11:57 (IST) 8 Dec 2022
नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजपा कार्यालयात

नरेंद्र मोदी संध्याकाळी ६ वाजता दिल्लीमधील भाजपा कार्यालयात जाणार. कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे.

11:43 (IST) 8 Dec 2022
गुजरातमध्ये भाजपाकडून जल्लोष

गुजरातमध्ये भाजपाकडून जल्लोष

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित होत आहेत. आता गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस की आप जिंकणार हे हळूहळू स्पष्ट होत आहे.