भारतीय जनता पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याची पत्नी रिवाबा जाडेजा यांचे देखील नाव आहे. रिवाबा यांना जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे. भाजपाने रवींद्र जाडेजाच्या पत्नीला तिकीट दिल्यानंतर आता काँग्रेस त्याची बहिण नयना जाडेजा यांना तिकीट देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आणखी वाचा- “जे शिंदे-फडणवीसांसमोर झुकले नाहीत ते…”; ‘शिवसेना फोडण्यासाठी ‘ईडी’चा वापर’ झाल्याचा आरोप करत ठाकरेंकडून हल्लाबोल
नयना या महिला काँग्रेस मोर्चाच्या अध्यक्षा असल्यामुळे त्यांना इथे उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चां रंगू लागल्या आहे. त्यामुळे आता जामनगरच्या मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होण्याती शक्यता आहे. जाडेजाची पत्नी रिवाबा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच नयना जाडेजा यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या नणंद भावजयांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
गुजरात विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तर गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृह राज्य असल्यामुळे येथील निवडणूक भाजप आपल्या प्रतिष्ठेची करुन लढविणार यात शंका नाही. यासाठी भाजपने विजयासाठी रणनिती आखत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये नुकत्याच झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेत लोकांचे प्राण वाचवणाऱ्या कांती अमृतिया यांना देखील तिकीट दिलं शिवाय रवींद्र जाडेजाच्या पत्नीलाही तिकीट दिलं आहे
याच सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील भाजपच्या उमेदवारांविरोधात त्याच ताकतीचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे जामनगरमधून जडेजाच्या पत्नी विरोधात त्याचीच बहिण उभी करुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार का हे पाहण महत्वाचं आहे.