गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने राज्यातील एकूण १८२ पैकी १६० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून काही दिग्गजांची नावे गायब आहेत, तर काही नव्या उपेक्षित चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. भाजपाने गुजरात विधानसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये नुकत्याच झालेल्या मोरबी येथील केबल पूल दुर्घटनेचे पडसाद पडल्याचं देखील दिसून आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारण भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये मोरबी पूल दुर्घटनेमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरुन लोकांची जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कांती अमृतिया यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील पूल कोसळल्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेदरम्यान कांती अमृतिया हे लोकांना वाचवण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. त्यांचा पाण्यात उतरुन लोकांना मदतकार्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांचे हेच मदतकार्य त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी जीवनदायी ठरलं आहे.

आणखी वाचा- Gujarat Elections: रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपाचं तिकीट; गुजरात निवडणुकीतून राजकीय पदार्पण!

दरम्यान, कांती अमृतिया यांनी यापूर्वीही भाजपाच्या तिकीटावर विधानसभेत मोरबी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय मोरबी मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री ब्रिजेश मेरजा यांचं तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे भाजपाने तिकीट वाटप करताना मोरबी दुर्घटनेमुळे राज्य सरकारच्या झालेल्या बदनामीचा डाग पुसण्याचा थोडाफार प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, कांती अमृतिया यांना भाजपने २०१७ मध्ये देखील विधानसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता.

आणखी वाचा- “राज्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्र्यांकडे, मोदी-शाहांची भेट घेणार आणि त्यांना…”; दिल्लीचा उल्लेख करत संजय राऊतांचं विधान

कांती अमृतिया सापडले होते वादात –

२०१४ ला कांती अमृतिया आमदार असताना त्यांनी एका का तरुणाला रॉडने मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते वादात सापडले होते. या व्हिडीओवरुन मोठा वाद देखील झाला होता. दरम्यान, आपण मारहाण केलेला तो तरुण तलवारीचा धाक दाखवत लोकांना धमकावत असल्याचे स्पष्टीकरण कांती यांनी दिले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat assembly elections bjp first list candidates morbi incident kanti amritiya brijesh merja jap