गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचला या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार थांबला होता. तर आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान होणार आहे. दरम्यान या मतदानाच्या अगोदर नवसारी जिल्ह्यातील वांसदा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार पीयूष पटेल वर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे.

या हल्ल्यात पटेल जखमी झाले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पीयूष पटेल हे वांसदा मतदारसंघातील झरी गावात होते. भाजपाने काँग्रेस उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. वंसदा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीयूष पटेल समर्थकांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वंसदा गुजरातमधील नवसारी जिल्ह्याचा भाग आहे आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ आरक्षित आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah opposes Muslim reservation in Chhatrapati Shivaji Maharajs Maharashtra
छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शहा यांचा घणाघात
Kishor Patkar latest marathi news
नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान
maharashtra vidhan sabha election 2024 jalgaon jamod assembly constituency bjp sanjay kute vs congress swati wakekar tight fight and vote division
जळगाव जामोदमध्ये भाजपची घोडदौड थांबणार?
maharashtra assembly election 2024 shrirampur ahmednagar assembly constituency mahayuti ajit pawar ncp vs shivsena shinde group
श्रीरामपुरमध्ये महायुतीतील अंतर्गत बेबनाव उघड
nagpur assembly election Rebelled 28 people suspended from Congress party for 6 years
अतिलोकशाही गैर न मानणारा काँग्रेस पक्ष यावेळी मात्र कठोर…एका झटक्यात तब्बल २८…
Rishikesh Patel and Atmaram Patel focus on Amravati election
गुजरातच्‍या ‘पटेलां’चे अमरावतीच्‍या निवडणुकीवर लक्ष !

२०१७ मधील निवडणुकीत भाजपने या टप्प्यात ८९ पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या होत्या व एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर ‘आप’ने ८८ उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय ट्रायबल पार्टीसह (बीटीपी) इतर ३६ राजकीय पक्षांनी विविध जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ३३९ अपक्ष रिंगणात आहेत. गुजरातमधील एकूण चार कोटी ९१ लाख ३५ हजार ४०० पैकी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण १४,३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी तीन हजार ३११ केंद्र शहरी भागात व ११ हजार ०७१ केंद्र ग्रामीण भागात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.