Premium

“सुवर्णमंदिरात राहुल गांधींचं पाकिट कोणी मारलं?”, माजी केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; काँग्रेसनेही दिलं प्रत्युत्तर…

त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू यांचीही नावं घेतली आहेत.

“सुवर्णमंदिरात राहुल गांधींचं पाकिट कोणी मारलं?”, माजी केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; काँग्रेसनेही दिलं प्रत्युत्तर…

माजी केंद्रीय मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या एका ट्वीटने सध्या खळबळ माजली आहे. काँग्रेसने त्यांच्यावर चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आळ घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमृतसरमधल्या सुवर्णमंदिराला भेट दिली. यानंतर हरसिमरत कौर यांनी हे ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी राहुल गांधी हे पंजाबच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. त्यांनी अमृतसरमधल्या सुवर्णमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब विधानसभा निवडणुकीसाठीचे काँग्रेसचे काही उमेदवारही होते. त्यानंतर गांधी यांनी संध्याकाळी जलंधर इथं भेट दिली आणि व्हर्च्युअली सभा घेतली. शीख धर्मस्थळाला भेट देताना मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा आणि ओपी सोनी हेही राहुल गांधी यांच्या सोबत होते.
“श्री हरमंदिर साहिब येथे राहुल गांधींचं पाकिट कोणी मारलं? चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिद्धू किंवा सुखविंदरजी? Z-Security मुळे राहुल गांधी यांच्या जवळ जाण्याची परवानगी फक्त या तीन लोकांनाच होती. अपवित्र घटनांनंतर आमच्या पवित्र मंदिराचे नाव बदनाम करण्याचा आणखी एक प्रयत्न,” हरसिमरत कौर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मात्र त्यांनी कथित घटनेबद्दल इतर कोणतीही माहिती दिली नाही.हरसिमरत कौर यांना प्रत्युत्तर देताना, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी त्यांची पोस्ट रिट्विट केली आणि असे काहीही झाले नसताना अशा खोट्या बातम्या पसरवणे हे निंदनीय आहे, असं म्हटलं आहे. सुरजेवाला यांनी हिंदीतील ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजकीय मतभेदांव्यतिरिक्त त्यांनी जबाबदारी आणि परिपक्वता दाखवली पाहिजे.

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा भाग असणे आणि शेतीच्या अध्यादेशांना मंजुरी देणे म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांचे खिसे कापण्यासारखे आहे, असे सांगून सुरजेवाला यांनीही कौर यांची खिल्ली उडवली. हरसिमरत कौर यांनी सप्टेंबर २०२० मध्ये वादग्रस्त कृषी कायद्यांमुळे राजीनामा देण्यापूर्वी त्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री होत्या.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harsimarat kaur badal rahul gandhi punjab elections 2022 amritsar golden temple vsk

First published on: 31-01-2022 at 13:18 IST
Show comments