Vidhan Sabha Election Results 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झाले. यानंतर आता या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) लागणार आहे. या निकालासाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. दरम्यान, हरियाणा (Haryana Result 2024) आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir Result 2024) विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झालं आहे.

हरियाणातील मतदारांचा सहभाग जवळपास ६७.९० टक्के इतका होता. यामध्ये सिरसा जिल्ह्यातील एलेनाबाद विधानसभेच्या जागेवर सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले. दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी हरियाणात एकाच टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, असं असलं तरी प्रत्येक्षात आज निकाल लागल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेत येणार? याबाबत सर्व स्पष्ट होईल.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
Raj Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “शाहरूख-सलमानचे चित्रपट शुक्रवारी पडले तरी…”, राज ठाकरेंची गुहागरमध्ये टोलेबाजी!
yogendra yadav BJP Traitor Party
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : Exit Polls: एग्झिट पोल खरे ठरतात का? हरियाणा व जम्मू-काश्मीरमध्ये काय आहे अनुभव? वाचा २०१४-१९ ची स्थिती!

मतमोजणीला सुरुवात

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी निवडणूक पार पडल्यानंतर आता ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालासाठी सकाळी ८ वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हरियाणातील नागरिकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

निकालांचे अपडेट कुठे मिळणार?

आज सकाळी निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु झाल्यानंतर जवळपास दुपारपर्यंत जम्मू- काश्मीर आणि हरियाणात कोणते सरकार येईल? याचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाचे अपडेट तुम्हाला loksatta.com या वेबसाईटवर वाचायला मिळतील. तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in अधिकृत संकेतस्थळावरही निकालाचे अपडेट मिळतील. या बरोबरच व्होटर हेल्पलाइन ॲपवरही तुम्हाला अपडेट मिळू शकतील.

३७० कलम हटवल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक

३७० कलम हटवल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir Result 2024) पहिल्यांदाच निवडणूक पार पडली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. यामध्ये पहिला टप्पा १८ सप्टेंबर, दुसरा टप्पा २५ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा १ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. दरम्यान, ३७० कलम हटवल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये ही निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे.