Haryana Vidhan Sabha Election 2024 Live Updates: हरियाणा राज्यात आज (५ ऑक्टोबर) विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असल्यामुळे त्यानुसार निवडणूक आयोगानं या राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. ८ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल लागेल. मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. यंदा काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. भाजपामधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. माजी कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४० जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला होता. जननायक जनता पार्टी (जेजेपी) ने १० जागांवर विजय मिळविला होता. भाजपाने जेजेपीशी आघाडी करून सत्ता स्थापन केली होती.

Live Updates

Haryana Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates | हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह अपडेट्स

10:30 (IST) 5 Oct 2024
Haryana Assembly Election 2024 Voting Live: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी ९ वाजेपर्यंत ९.५३ टक्के मतदान

हरियाणा विधानसभेची मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ९.५३ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

09:31 (IST) 5 Oct 2024
Haryana Election 2024 Voting Live Updates: 'मी पहिल्यांदाच मतदान केलं, तुम्हीही करा', ऑलिम्पिक पदकविजेती मून भाकेरचं युवकांना आवाहन

ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मनू भाकेरने आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी झज्जर येथे मतदान केले. यानंतर माध्यमांशी बोलताना तिने युवकाना मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जर आपल्याला समाजात बदल घडवायचा असेल तर मतदानासाठी पुढे यावे लागेल, योग्य उमेदवार निवडावा लागेल, असे तिने सांगितले.

https://twitter.com/ANI/status/1842383683870929170

09:05 (IST) 5 Oct 2024
Haryana Election 2024 Voting Live Updates: काँग्रेसच्या काळात हरियाणातील क्रीडा क्षेत्राचा स्तर चांगला होता - विनेश फोगट

काँग्रेसच्या तिकीटावर जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट यांनी आज सकाळी चरखी दादरी येथे मतदान केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात हरियाणात क्रीडा क्षेत्राचा स्तर चांगला असल्याचे म्हटले. तसेच मंत्रि‍पदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, याचा निर्णय पक्ष घेणार आहे. आताच याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.

https://twitter.com/ANI/status/1842386308226040099

08:14 (IST) 5 Oct 2024
Haryana Election 2024 Voting Live Updates: 'भाजपा विजयाची हॅटट्रिक, तर काँग्रेसचा सुपडा साफ', मुख्यमंत्री नायब सैनी यांचा विश्वास

हरियाणाचे विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज अंबाला येथे मतदान केल्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी आरक्षणावर विदेशात टीका करून त्यांचा खरा चेहरा उघड केला आहे. या निवडणुकीत भाजपा मोठा विजय प्राप्त करून काँग्रेसचा सुपडा साफ करेल, असे विधान त्यांनी केले.

https://twitter.com/PTI_News/status/1842392455229952480

07:52 (IST) 5 Oct 2024
Haryana Assembly Election 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीची थोडक्यात माहिती

- ९० जागांसाठी एकूण १,०३१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १०१ महिला उमेदवार, तर ४६४ अपक्ष उमेदवार आहेत.

- मतदानासाठी २०,६३२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

- भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्ष, आयएनएलडी-बसपा, जेजेपी-आझाद समाज पार्टी यांच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.

07:40 (IST) 5 Oct 2024
Haryana Election 2024 Voting Live Updates: ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकेरनं केलं मतदान

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुटिंग या खेळात दोन कास्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकेरने आपल्या कुटुंबासह सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

https://twitter.com/ANI/status/1842380570711773454

Campaigning Ends In Haryana

हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची गुरुवारी सांगता झाली<br />फोटो- indian express