Haryana Vidhan Sabha Election 2024 Live Updates: हरियाणा राज्यात आज (५ ऑक्टोबर) विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असल्यामुळे त्यानुसार निवडणूक आयोगानं या राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. ८ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल लागेल. मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. यंदा काँग्रेसकडून सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. भाजपामधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. माजी कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४० जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला होता. जननायक जनता पार्टी (जेजेपी) ने १० जागांवर विजय मिळविला होता. भाजपाने जेजेपीशी आघाडी करून सत्ता स्थापन केली होती.
Haryana Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates | हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह अपडेट्स
अकोला : संत श्री सेवालाल महाराज यांनी कुठलाही भेदभाव न करता माणुसकीवर प्रेम करा, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करण्याचा संदेश दिला होता. तेच तत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.
पुणे: कोंढवा भागातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर कोंढवा भागात पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
नागपूर : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंबीय शुक्रवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर निवासस्थानी पोहचले. यावेळी त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. यात नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर साकारण्यात आलेल्या ‘बर्ड पार्क’वरही चर्चा झाली. देशातील हा पहिला बर्ड पार्क आहे.
अमरावती: दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी शिरजगाव कसबा-देऊरवाडा मार्गावरील वळणावर घडला.
नागपूर : गेले काही दिवस अडखळलेल्या माेसमी पावसाची परतीची वाटचाल पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मध्यप्रदेशातून मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचला आहे. आज शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. दरम्यान, राज्यातून काढता पाय घेत असतानाच पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे.
सविस्तर वाचा
हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी काँग्रेसने मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यावर कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, संपूर्ण हरियाणात काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण दिसत आहे. भाजपाचे आरोप बिनबुडाचे आहेत. आम्ही चुकीचं काही काम करत नाही, आमचा मतदारांवर विश्वास आहे.
VIDEO | Haryana elections 2024: "The atmosphere is positive (for Congress)…" says Congress candidate from Julana Assembly constituency, Vinesh Phogat (@Phogat_Vinesh). #HaryanaElections2024
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2024
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/yQ3y8F6NiX
पुणे : महिला, शाळकरी मुलींवर होणारे अत्याचारांची प्रकरणे फक्त पोलिसांपुरती मर्यादित नाही. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी केली.
हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.१ टक्के मतदान झाले आहे. अजूनही मतदानाला तास बाकी असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
हिसार जिल्ह्यातील नारनौड येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. याचा व्हिडीओ पीटीआय वृत्तसंस्थेने एक्सवर टाकला आहे.
VIDEO | Haryana Elections 2024: A clash broke out between BJP, Congress workers outside a polling booth in #Narnaud area of #Hisar. More details are awaited.#HaryanaElection2024#HaryanaAssemblyElections2024
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2024
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/oCR93MzL17
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खोकसा गाव परिसरात शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य हादरे बसले. गुजरातमधील गांधीनगरच्या भूकंपमापन यंत्रात २.२ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली गेली. वारंवार बसणाऱ्या हादऱ्यांमुळे परिसरातील ग्रामस्थ पुरते घाबरले आहेत. ग्रामस्थ रात्र रस्त्यावरच जागून काढत असल्याचे चित्र आहे.
धुळे जिल्ह्यात अमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रकार अधुनमधून होत असताना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकून ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक कोटी २५ लाख रुपयांचा गांजा हा अमली पदार्थ आणि अन्य मुद्देमाल जप्त केला.
हरियाणा विधानसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत ३६.६९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मेवत मतदारसंघात सर्वाधिक ४२.६४ टक्के मतदान झालं आहे. त्यानंतर यमुनानगर ४२.८ टक्के, जिंद ४१.९३ टक्के मतदान झालं. तर पंचकुला येथे सर्वात कमी २५.८९ टक्के मतदानाची नोंद झाली.
36.69% voter turnout recorded till 1 pm in Haryana Assembly elections.
— ANI (@ANI) October 5, 2024
As of 1 pm, Mewat recorded the highest voter turnout of 42.64%, followed by Yamunanagar at 42.08% and Jind at 41.93%. Panchkula recorded the lowest voter turnout at 25.89% pic.twitter.com/xaNXGa0evk
माजी कुस्तीपटू आणि काँग्रेसचा नेता बजरंग पुनियाने आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पत्नी आणि कुटुंबियांसह मतदान केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यानं काँग्रेसला ९० जागांपैकी जवळपास ६० ते ७० जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. मागच्या १० वर्षात राज्यातील जनता होरपळत होती, आता त्यांना मतदानाच्या माध्यमातून स्वतःचं सरकार निवडण्याची संधी मिळाली आहे, असेही तो म्हणाला.
#WATCH | Jhajjar, Haryana: After casting his vote, Congress leader and wrestler Bajrang Punia says, "I appeal to the people of Haryana to vote as much as possible. Today there is a lack of employment in Haryana. The government that was in power from 2005-2014, every section of… https://t.co/UjIjulb8b9 pic.twitter.com/Fs3C1AQNuV
— ANI (@ANI) October 5, 2024
मुंबई : समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे केवळ सागरी जीवांचेच, नाही तर मानवांचेही नुकसान होत आहे, असे नमूद करून मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी चिंता व्यक्त केली. तसेच, या प्रदूषणाची दखल घेऊन या प्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे स्पष्ट केले.
Haryana Election 2024 Voting Live Updates: भाजपाचे खासदार नवीन जिंदल यांनी हरियाणा विधानसभेसाठी कुरुक्षेत्र येथे मतदान केलं. यावेळी मतदान केंद्रावर ते घोड्यावर बसून आले. याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, कोणतंही शुभ काम करण्याआधी घोड्यावर बसून आल्यास त्या कामात यश मिळतं. भाजपाचा विजय पक्का आहे, याची खात्री असल्यामुळेच मी घोड्यावर बसून मतदानासाठी आलो.
#WATCH | Haryana: BJP MP Naveen Jindal reaches a polling station in Kurukshetra on a horse, to cast his vote for the Haryana Assembly elections. pic.twitter.com/cIIyKHXg0n
— ANI (@ANI) October 5, 2024
मुंबई: मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. लोकार्पणानंतर लागलीच आरे – बीकेसी टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) हा टप्पा प्रवाशांसाठी सोमवारपासून खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी १० वाजेपर्यंत १८.१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. सर्वाधिक यमुनानगर येथे २३.१ टक्के तर फरीदाबाद येथे सर्वात कमी १३.६ टक्के इतके मतदान झाले.
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिला सशक्तीकरण कार्यक्रम तसेच विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन, उद्घाटन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने परिवहन सेवेच्या टीएमटी बसगाड्या सभेसाठी वळविल्या आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सावंतवाडी: वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात मध्यरात्री मच्छीमार बोट पलटी होवून झालेल्या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला. आनंद पराडकर (वय ५८, रा. श्रीरामवाडी) व रघुनाथ येरागी (वय ४८, रा.खवणे) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती निवती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
मी मतदान केलं आहे. इतरांनीही मतदानासाठी पुढे यावे आणि लोकशाहीला मजबूत करावे. भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असून राज्यात कमळ फुलणार आहे. तसेच नायब सिंह सैनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे कुस्तीपटू आणि भाजपा नेता योगेश्वर दत्त म्हणाला.
#WATCH | Sonipat, Haryana: After casting his vote, Wrestler and BJP leader Yogeshwar Dutt says, "I have cast my vote in my village and I request people to vote as much as possible and strengthen democracy, play your important role in forming a strong government, vote to take… https://t.co/Qn5g0tQWXL pic.twitter.com/6OkrwQbZHM
— ANI (@ANI) October 5, 2024
हरियाणा विधानसभेची मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ९.५३ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मनू भाकेरने आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी झज्जर येथे मतदान केले. यानंतर माध्यमांशी बोलताना तिने युवकाना मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जर आपल्याला समाजात बदल घडवायचा असेल तर मतदानासाठी पुढे यावे लागेल, योग्य उमेदवार निवडावा लागेल, असे तिने सांगितले.
#WATCH | On casting her first vote, Olympic medalist Manu Bhaker says, "Being the youth of this country, it is our responsibility to cast our vote for the most favourable candidate. Small steps lead to big goals… I voted for the first time…" https://t.co/806sYLcpoe pic.twitter.com/vQ5j4m7fFB
— ANI (@ANI) October 5, 2024
काँग्रेसच्या तिकीटावर जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट यांनी आज सकाळी चरखी दादरी येथे मतदान केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात हरियाणात क्रीडा क्षेत्राचा स्तर चांगला असल्याचे म्हटले. तसेच मंत्रिपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, याचा निर्णय पक्ष घेणार आहे. आताच याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.
#WATCH | Congress candidate from Julana Assembly Constituency Vinesh Phogat arrives at a polling station in Charkhi Dadri to cast her vote for #HaryanaElelction
— ANI (@ANI) October 5, 2024
She says, "It is a huge festival for Haryana and a very big day for the people of the state. I am making an appeal to… pic.twitter.com/7LoYTR0Xvl
हरियाणाचे विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज अंबाला येथे मतदान केल्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी आरक्षणावर विदेशात टीका करून त्यांचा खरा चेहरा उघड केला आहे. या निवडणुकीत भाजपा मोठा विजय प्राप्त करून काँग्रेसचा सुपडा साफ करेल, असे विधान त्यांनी केले.
VIDEO | Haryana Election 2024: "We (BJP) are winning and forming the government for the third time with a big margin. The BJP will form government in Haryana for the third time with a historic margin. People have rejected 'jhooth ki rajneeti' (politics of lies) of the Congress.… pic.twitter.com/l0FfWdP7Uw
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2024
– ९० जागांसाठी एकूण १,०३१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १०१ महिला उमेदवार, तर ४६४ अपक्ष उमेदवार आहेत.
– मतदानासाठी २०,६३२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
– भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्ष, आयएनएलडी-बसपा, जेजेपी-आझाद समाज पार्टी यांच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुटिंग या खेळात दोन कास्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकेरने आपल्या कुटुंबासह सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
#WATCH | Olympic medalist & Indian shooter Manu Bhaker arrives at a polling station in Jhajjar to cast her vote for the #HaryanaElelction pic.twitter.com/LPEigw00mn
— ANI (@ANI) October 5, 2024
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची गुरुवारी सांगता झाली<br />फोटो- indian express