Haryana Assembly Election 2024 Vote Counting Live Updates : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आता जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर होत आहेत. पुढील काही वेळात अंतिम निकाल हाती येईल. खरं तर हरियाणामध्ये निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले, त्यामध्ये जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या बाजुने कौल देण्यात आला आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसला धक्का बसला असून भाजपा आघाडीवर आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निकालाच्या सर्व घडामोडी पाहा एकाच क्लिकवर…
Haryana Vidhan Sabha Election 2024 Vote Counting Live Updates, 08 October 2024 : हरियाणामध्ये विधानसभेच्या निकालासंबंधीचे सर्व अपडेट्स या ब्लॉगमध्ये मिळतील.
हरियाणात भाजपाचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डबल इंजिन सरकारचे फायदे काय आहेत, याची जाणीव राज्यातील लोकांना झाल्यामुळेच हरियाणाच्या मतदारांनी पुन्हा भाजपाची सत्ता आणली. किसान, जवान, पैलवान... यांचा हा विजय आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हरियाणाच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे. १० वर्षांत त्यांनी केलेल्या योजनांचा फायदा झाला. एग्झिट पोल्सनी काँग्रेसची सत्ता येईल असे सांगितले होते. मात्र तरीही मला विश्वास होता की, भाजपाचा बहुमताने विजय होईल. मी मागच्या काही महिन्यात चांगले काम केले होते. पंतप्रधान मोदींच्या योजनांमुळे हा विजय झाला आहे.
बसपा प्रमुख मायावती यांनी हरियाणा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. बसपाला एकही जागा मिळाली नाही. याबद्दल त्यांनी जाट समाजाला कारणीभूत ठरविले. जाट समाजाच्या जातीय मानसिकतेमुळे बसपाला मतदान मिळाले नाही, असा आरोप त्यांनी केला.
भाजपाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. वातावरण विरोधात असतानाही धर्मेंद्र प्रधान यांनी शांतपणे, पडद्यामागे राहून काम केले. संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि रणनीती तयार केली. त्याचे फळ म्हणून हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यात भाजपाला यश आले.
भाजपाने हरियाणात पूर्ण बहुमताचा आकडा पार केला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या मंत्रीमंडळातील आठ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. सविस्तर बातमी वाचा
हरियाणातील विजय हा लोकशाहीचा विजय आहे. हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. हरियाणाच्या जनतेने नवा इतिहास रचला आहे. या विजयाबाबत मी हरियाणातील जनतेचे अभिनंदन करतो. तसेच त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या निवडणुकीत हरियाणातील प्रत्येक जातीधर्माच्या जनतेने भाजपाला मत दिले आहे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे.
हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निकाल...”
एग्झिट पोल्सचे अंदाज आणि राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष पाहून यावेळी हरियाणात काँग्रेस पक्ष सत्तेत येणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आजच्या (८ ऑक्टोबर) मतमोजणीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपाने सलग तिसऱ्यांना हरियाणात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. दरम्यान, या पराभवाबाबत आता काँग्रेस पक्षाकडून भाष्य करण्यात आलं आहे.
Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत जेजेपीला मोठा धक्का बसला आहे. जननायक जनता पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांना उचाना कलान मतदारसंघ राखण्यात अपयश आले. या जागेवर भाजपाचे देवेंद्र चतुर्भुज अत्री अवघ्या ३९ मतांनी विजयी झाले आहेत. देवेंद्र चतुर्भुज अत्री यांना ४८७८८ तर बिरेंद्र सिंह यांचा मुलगा ब्रिजेंद्र सिंह यांना ४८७४९ मते मिळाली. तर माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा दारूण पराभव झाला आहे.
Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत जेजेपीला मोठा धक्का बसला आहे. जननायक जनता पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांना उचाना कलान मतदारसंघ राखण्यात अपयश आले. या जागेवर भाजपाचे देवेंद्र चतुर्भुज अत्री अवघ्या ३९ मतांनी विजयी झाले आहेत. देवेंद्र चतुर्भुज अत्री यांना ४८७८८ तर ब्रिजेंद्र यांना ४८७४९ मते मिळाली.
Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने मोठं यश मिळवलं आहे. आता हरियाणात तिसऱ्यांदा भाजपाच सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपा ५० जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसने ३५ जागांवर आघाडी घेतली. आता काही वेळात निकाल स्पष्ट होईल. मात्र, याआधी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले, "भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल मी हरियाणाच्या जनतेचे आभार मानतो. विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा हा विजय आहे. मी जनतेला खात्री देतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. या महान विजयासाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. ज्यांनी अथक परिश्रम केले आणि पूर्ण समर्पण केले. तुम्ही केवळ राज्यातील जनतेची पूर्ण सेवा केली नाही, उलट विकासाचा अजेंडाही त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्याचाच परिणाम म्हणून हरियाणात भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे", अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsहरियाणा का हृदय से आभार! भारतीय जनता पार्टी को एक बार फिर स्पष्ट बहुमत देने के लिए मैं हरियाणा की जनशक्ति को नमन करता हूं। यह विकास और सुशासन की राजनीति की जीत है। मैं यहां के लोगों को विश्वास दिलाता हूं कि उनकी आकांक्षाओं को पूरा करने के लिए हम कोई कोर-कसर नहीं छोड़ेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024
Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने ५० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ३५ जागांवर आघाडी घेतली. थोड्यावेळात निकाल स्पष्ट होईल. मात्र, आता एक महत्वाची बातमी समोर आली असून हरियाणात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. हरियाणा प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांचा होडलमधून पराभूत झाले आहेत. भाजपाच्या हरिंदर सिंह यांच्याकडून २,५०० मतांनी त्यांचा पराभव झाला.
Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणात भारतीय जतना पक्षाने ५० जागांवर आघाडी घेतली असून हरियाणात भाजपा तिसऱ्यांचा सरकार स्थापन करणार आहे. अद्यापही मतमोजणी सुरु आहे. थोड्या वेळांत अंतिम निकाल स्पष्ट होईल. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत हरियाणाच्या विजयाबाबत भाजपाच्या नेत्यांचं कौतुक केलं आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले, केंद्रातील मोदीजींची सलग तिसऱ्यांदा निवडणूक असो किंवा हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश असो, किंवा इतर राज्यांमध्येही पुन्हा पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन होणे असो. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाने अवलंबलेली कामगिरी यावरून दिसून येते. भारतीय राजकारणात एक नवीन युग सुरू झाले आणि जनतेचा त्यावर अतूट विश्वास आहे.आधी लोकसभा निवडणुकीत आणि आता हरियाणात मत मिळवण्यासाठी खोटी आणि हवेशीर आश्वासने देणाऱ्या काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारले. जनता जमिनीवर पोहोचणाऱ्या भाजपाच्या पाठीशी खडकासारखी उभी आहे. शेतकऱ्यांची आणि सैनिकांची भूमी असलेल्या हरियाणाने आपल्या व्होट बँकेसाठी परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवला. भाजपला सलग तिसऱ्यांदा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी हरियाणाच्या जनतेचे मनापासून आभार मानतो", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsअपने वोट बैंक के लिए विदेश में जाकर देश का अपमान करने वालों को किसानों और जवानों की भूमि हरियाणा ने सबक सिखाया है।लगातार तीसरी बार भाजपा को प्रदेश की सेवा करने का अवसर देने के लिए हरियाणा की जनता का हृदय से आभार व्यक्त करता हूँ। मोदी जी के नेतृत्व में भाजपा की केंद्र और प्रदेश…
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2024
Jairam Ramesh On Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणात भारतीय जतना पक्षाने ५० जागांवर आघाडी घेतली तर काँग्रेस पिछाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. आधी काँग्रेस ५५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर होतं. मात्र, त्यानंतर काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आणि भाजपाने आघाडी घेतली. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, "हरियाणाच्या निकालाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे सातत्याने तक्रार करत आहोत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे उत्तरही दिले. मात्र, आता देखील तीन ते चार जिल्ह्यांतून तक्रारी येत आहेत. हरियाणा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आहेत. हे आम्ही स्वीकारू शकत नाही. तंत्राचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे", असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.js#watch दिल्ली: कांग्रेस सांसद जयराम रमेश ने कहा, " हरियाणा के संदर्भ में हम चुनाव आयोग से दोपहर से लगातार शिकायत कर रहे हैं। उनसे जवाब आया और हम उसका भी जवाब दे रहे हैं....हम सब शिकायत लेकर चुनाव आयोग के सामने कल या परसों पेश करेंगे। हरियाणा चुनाव के नतीजे हमें अस्वीकार्य है… pic.twitter.com/ippCVJeQA4
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2024
Haryana Assembly Election 2024 Result Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत बहादुरगढ़ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेश जून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे राजेश जून यांचा पराभव केला, जे भाजपचे दिनेश कौशिक यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होते.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पुन्हा एकदा सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सत्तेपासून लांब राहणार आहे. आज झालेल्या मतमोजणीवर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान प्रतिक्रिया देत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. अनीती नष्ट झाली असून या निवडणुकीत धर्माचा विजय झाला. कल्याण फक्त भाजपाच करू शकतो, हरियाणातील जनतेने ही भावना व्यक्त केली, असं मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.js#watch सीहोर, मध्य प्रदेश: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान ने कहा, "अधर्म का नाश हुआ...धर्म की विजय हुई है...भाजपा ही कल्याण कर सकती है, इस भाव को हरियाणा की जनता ने प्रकट किया है..." pic.twitter.com/lbsMQJv99W
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मात्र, मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, भारतीय जनता पक्ष ५० जागांवर आघाडीवर आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. आता हरियाणात नवे मुख्यमंत्री कधी शपथ घेणार? याबाबत तारीख देखील समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी १२ ऑक्टोबरला होऊ शकतो.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत अंबाला कँट विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनिल विज यांनी म्हटलं की, "आम्ही कार्यकर्ते आहोत आणि जनतेने जी काही जबाबदारी दिली आहे. ती आम्ही पूर्ण करतो. काँग्रेस लोकांपासून दूर आहे. काँग्रेसला जनतेचे प्रश्न कळत नाहीत. आम्ही लोकांमध्ये राहतो, त्यामुळेच भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल", असा दावा मी पहिल्या दिवसापासून करत होतो", असं अनिल विज यांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.js#watch अंबाला, हरियाणा: अंबाला कैंट विधानसभा सीट से भाजपा उम्मीदवार अनिल विज ने कहा, "हम कार्यकर्ता हैं और जनता जो भी दायित्व देती है, उसको हम पूरी तरह से निभाते हैं...कांग्रेस लोगों से बहुत दूर है, कांग्रेस को लोगों की तकलीफें नहीं पता...हम जनता में रहते हैं इसलिए मैं पहले दिन… pic.twitter.com/alWOAUnJ6M
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हरियाणामध्ये जवळजवळ एकमेकांच्या बरोबरीने आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपा सत्ताधारी पक्षाने २९ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेस २८ जिंकल्या आहेत.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेतली. हरियाणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल. आता हरियाणात भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. यावर आता मनोहर लाल खट्टर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "काँग्रेस सातत्याने खोटे बोलत होते. पण जनतेने त्यांचे मत नाकारले. सरकारची कार्य धोरणे जनतेने स्वीकारली. हरियाणात तिसऱ्यांदा कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन न केल्याने हा एक विक्रम ठरला आहे. हरियाणात भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल", असं मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं आहे.
Harayana Result 2024 Live : हरियाणात विधानसभा निवडणुकीत गुडगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश शर्मा विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
Harayana Result 2024 Live : हरियाणात विधानसभा निवडणुकीत आयएनएलडीचे उमेदवार आदित्य चौटाला यांनी म्हटलं की, "मी १० वर्षे विकासाच्या मुद्द्यांवर काम केले, लोकांनी मला आशीर्वाद दिले आहेत. मी सर्वांचे आभार मानतो. विशेषत: ओम प्रकाश चौटाला यांनी मला आमदार म्हणून आशीर्वाद दिला. त्यांच्या आशीर्वादाने आज मी लोकसेवक झालो आहे. सर्वांचे आभार!", असं आदित्य चौटाला यांनी म्हटलं.
Harayana Result 2024 Live : हरियाणात भारतीय जतना पक्षाने मोठी मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेतली. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असून तिसऱ्यांदा भाजपा हरियाणात सत्तेत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील भाजपाच्या कार्यालयात जल्लोष केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js#watch | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis joins party workers celebrating the party's performance in the Haryana elections, at the party office in Mumbai.Out of 90 assembly seats in Haryana, BJP has won 29 and is leading on another 20 seats as of 4.41 pm. pic.twitter.com/MCfGq1DOHL
— ANI (@ANI) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने मोठी मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तसेच तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील भाजपा मुख्यालयात फटाके फोडले जात आहेत. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आनंद साजरा करत आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js#watch | Firecrackers being burst at the BJP headquarters in Delhi as party leaders and workers celebrate party's performance in the Haryana Assembly elections pic.twitter.com/gqkliIG5gU
— ANI (@ANI) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने मोठी मुसंडी मारली. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हरियाणात काँग्रेसचे १० तर भाजपाचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांचाही विजय झाला आहे. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे देखील लाडवा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js#watch | Kurukshetra: Haryana CM Nayab Singh Saini says "I want to thank the 2.80 crore people of Haryana for putting a stamp on the works of BJP for the third time. All this is only because of PM Modi. Under his leadership, we are moving forward. He spoke to me and gave his… pic.twitter.com/jPmMecyA8D
— ANI (@ANI) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत उद्योगपती आणि कुरुक्षेत्राचे खासदार नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल या हिसार मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे गढी संपला किलोई विधानसभा मतदारसंघामधून ७१,४६५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
https://platform.twitter.com/widgets.js#haryanaelections | गढ़ी सांपला-किलोई से पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस उम्मीदवार भूपेंद्र सिंह हुड्डा 71,465 वोटों से जीते।(फाइल फोटो) pic.twitter.com/1zhou3eLPr
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. मात्र, काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपा ५० जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत हरियाणात ९० पैकी १६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये काँग्रेस १० तर भाजपा ६ उमेदवार विजयी झाले आहेत.
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरसीची लढत पाहायला मिळाली होती. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. तर भारतीय जनता पक्षाने सत्तेची हॅटट्रीक करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, आता निवडणुकीच्या निकालात कोणत्या पक्षाला धक्का बसणार? आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे.