Haryana Assembly Election 2024 Vote Counting Live Updates : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आता जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर होत आहेत. पुढील काही वेळात अंतिम निकाल हाती येईल. खरं तर हरियाणामध्ये निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले, त्यामध्ये जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या बाजुने कौल देण्यात आला आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसला धक्का बसला असून भाजपा आघाडीवर आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निकालाच्या सर्व घडामोडी पाहा एकाच क्लिकवर…
Haryana Vidhan Sabha Election 2024 Vote Counting Live Updates, 08 October 2024 : हरियाणामध्ये विधानसभेच्या निकालासंबंधीचे सर्व अपडेट्स या ब्लॉगमध्ये मिळतील.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जतना पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. मात्र, काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपा ५० जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. या निकालावर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी म्हटलं की, “मला लाडवा विधानसभा मतदारसंघातील आणि हरियाणातील २.८० कोटी लोकसंख्येचे आभार मानायचे आहेत. या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते”, असं मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी म्हटलं आहे.
#watch | #haryanaelection Haryana CM Nayab Singh Saini says "I want to thank the people of Ladwa and the 2.80 crore population of Haryana. The credit for this victory goes to PM Modi. The people of Haryana have put a stamp on the policies of PM Modi…" pic.twitter.com/2CzsZ6JW9P
— ANI (@ANI) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : झज्जर जिल्ह्यातील बादली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुलदीप यादव यांनी भाजपाच्या ओमप्रकाश धनखड यांचा पराभव केला आहे. कुलदीप यांना ६७,५५५ मतं मिळाली आहेत, तर धनखड यांना ५१,०५२ मतं मिळवता आली.
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”
हरियाणात विधानसभा निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. या मतमोजणीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हरियाणात आपने इंडिया आघाडीबरोबर न जागा स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना अद्याप खातेही उघडता आलेले नाही. दरम्यान, निकालाबाबत आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही आपच्या या पराभवाबाबत भाष्य केलं आहे. दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
Harayana Result 2024 Live : नांगल चौधरी विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. मतमोजणीच्या १५ व्या फेरीनंतर भाजपा उमेदवार डॉ. अभयसिंह यादव १०२३ मतांनी मागे राहिले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार मंजू चौधरी यांनी आघाडी घेतली आहे.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत कैथलमधून विजयी घोषित झाल्यानंतर काँग्रेस नेते आदित्य सुरजेवाला यांची मोठी रॅली काढण्यात आली आहे.
#watch | #haryanaassemblyelection2024 | Congress leader Aditya Surjewala holds roadshow in Kaithal after being declared winner from the Assembly constituency pic.twitter.com/SkNERVB2j1
— ANI (@ANI) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा ५० जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात काँग्रेसला धक्का बसला आहे, तर भाजपा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. आता थानेसर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अशोक कुमार अरोरा विजयी झाले आहेत. तर भाजपाचे सुभाष सुधा यांचा पराभव झाला आहे.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जुलाना विधानसभेच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार योगेश यांचा पराभव केला आहे. त्यानंतर विनेश फोगाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगाट यांनी म्हटलं की, “हा प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा लढा आहे जो नेहमी संघर्षाचा मार्ग निवडतो. या देशाने मला दिलेल्या प्रेमाचे मी नेहमीच कौतुक करेन. अद्याप सर्व जागांचे निकाल स्पष्ट झालेले नाहीत. अजून काही स्पष्ट नाही. आता मी राजकारणात राहणार आहे”, असं विनेश फोगाट यांनी म्हटलं आहे.
#watchpic.twitter.com/ZTIlcmlb21
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा ४९ जागांवर आघाडीवर आहे. तसेच काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे हरियाणात भाजपा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज तिवारी म्हणाले, “मी हरियाणाचा (भाजपा) स्टार प्रचारक होतो. त्यामुळे मी पाहिलं आहे की जमिनीवरचे सत्य वेगळे आहे. आम्हाला लोकांचा अभिमान आहे. जे लोक काम करतात, प्रामाणिक असतात त्यांच्यासोबत चालायला तयार असतात”, असं मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.
#watch | On Haryana election result trends, BJP MP Manoj Tiwari says, " I have been a (BJP) star campaigner for Haryana…wherever I went…the truth on the ground is very different…we are not taking this as pride but respect of people…we could see the blueprint of the… pic.twitter.com/9R4LJwiz59
— ANI (@ANI) October 8, 2024
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर असून भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली. भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हरियाणात भाजपचा जल्लोष सुरू केला आहे. भाजपाने राजकीय हालचाली सुरु केल्या असून हरियाणाच्या निकालादरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री सैनी यांच्याशी चर्चा फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदी संध्याकाळी ७ वाजता भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे.
Harayana Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारी नुसार, भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. हरियाणातील तोशाम मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. या मतदारसंघात भाजपाच्या श्रुती चौधरी या काँग्रेसच्या अनिरुद्ध चौधरी यांच्यावर ११५६६ मतांनी आघाडीवर आहेत. श्रुती चौधरी यांना आतापर्यंत ६०३६३ मते मिळाली आहेत. तोशाम ही राज्यातील प्रसिद्ध जागांपैकी एक आहे जिथे भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज वीरेंद्र सेहवागने काँग्रेसच्या अनिरुद्ध चौधरींसाठी प्रचार केला होता.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर तर भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. मात्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जुलाना विधानसभेच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार योगेश यांचा पराभव केला आहे.
Harayana Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून आता समोर आलेल्या कलानुसार भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय जतना पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. यातच ज्येष्ठ नेते सुरेंद्र सिंह नागर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी पोहोचले आहेत.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर तर भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे उमेदवार आदित्य सुरजेवाला यांनी कैथल विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या लीला राम यांच्यावर ११०३५ मतांच्या फरकाने आघाडी कायम ठेवली आहे.
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर असून भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हरियाणात भाजपचा जल्लोष सुरू केला आहे. तर भाजपाने राजकीय हालचाली सुरु केल्या असून हरियाणाच्या निकालादरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री सैनी यांच्याशी चर्चा फोनवरून चर्चा केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी संध्याकाळी ७ वाजता भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. एग्झिट पोल्सनी काँग्रेसला बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्या काँग्रेस केवळ ३६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजपा ४९ जागांवर आघाडी घेऊन सर्वात पुढे आहे. सविस्तर बातमी वाचा
निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ माहिती अपडेट करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला आहे. सविस्तर बातमी वाचा
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार, काँग्रेस पिछाडीवर गेलं आहे. भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हरियाणात भाजपचा जल्लोष सुरू केला आहे. हरियाणातील अंबालामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मतमोजणीत भाजपाला आतापर्यंत समोर आलेल्या कलामध्ये भाजप कार्यकर्ते अंबाला येथील पक्ष कार्यालयात आनंदोत्सव साजरा करत आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात भाजपा ९० पैकी ४९ जागांवर आघाडीवर आहे. तसेच भाजपाने कार्यकर्त्यांनी १०० किलो जिलेबीची ऑर्डर दिली आहे.
#watch | Haryana: BJP workers celebrate at the party office in Ambala, as they monitor the counting trends.
— ANI (@ANI) October 8, 2024
As per the latest EC data, BJP is leading on 49 of the 90 seats in the state. #haryanaassemblypolls2024 pic.twitter.com/rfi1o93ar4
Harayana Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार, भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, काँग्रेस पिछाडीवर गेलं आहे. भाजपा ४९ तर काँग्रेसची ३५ जागांवर आघाडीवर आहे. यानंतर आता आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, “लोकसभा निवडणुकीप्रमाणे हरियाणातही निवडणूक आयोग संथ गतीने डेटा अपडेट करत आहे. जुनी आकडेवारी आणि दिशाभूल करणाऱ्या कलाच्या माध्यमातून भाजपाला प्रशासनावर दबाव आणायचा आहे का?”, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.
Harayana Result 2024 Live : हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या निकालावर भाजपा नेते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “हा लोकशाहीचा विजय आहे. आज इतिहास घडवला जात आहे. कारण सध्याचा कल दर्शवत आहेत की, हरियाणामध्ये भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. जम्मू-काश्मीरमधील निवडणुका ऐतिहासिक आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने मागील निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ”, असं गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे.
Harayana Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार, भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, काँग्रेस पिछाडीवर गेलं आहे. भाजपा ४७ तर काँग्रेसची ३६ जागांवर आघाडीवर आहे. यावर आता काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शशी थरूर यांनी म्हटलं आहे की, “अजून संपूर्ण निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे आता कोणताही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. सध्या, हरियाणा ते (भाजपा) आघाडीवर दिसत आहेत. भाजपाच्या बहुसंख्य जागा आघाडीवर राहणे हे खरंच आश्चर्यकारक आहे. प्रामाणिकपणे अंतिम निकालाची वाट पाहू. अशी माझी स्वतःची भावना आहे. हरियाणातील चिन्हे आमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये भारत ब्लॉक जे अपेक्षा करत होते त्यापेक्षा चांगले आहेत”, असं खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
#watch | Thiruvananthapuram | On Haryana, J&K election trends, Congress MP Shashi Tharoor says, "…We have to wait and see…We shouldn't make a premature conclusion right now…At the moment, they (BJP) seem to be leading in a majority of the seats (in Haryana) which is a… pic.twitter.com/82SMmICldm
— ANI (@ANI) October 8, 2024
Harayana Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार, भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, काँग्रेस पिछाडीवर गेलं आहे. भाजपा ४७ तर काँग्रेसची ३६ जागांवर आघाडीवर आहे. सकाळपासून या आकड्यांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. आता थोड्या वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.
Harayana Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. भाजपा ४६ तर काँग्रेसची ३७ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे हरियाणातील आकड्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. यातच निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, चौथ्या आकडेवारीच्या मतमोजणीनंतर अभय सिंह चौटाला ५ हजार मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत.
Harayana Election Result 2024 Live : कुस्तीच्या आखाड्यातून थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विनेश फोगाट सध्या तिसऱ्या फेरीनंतर दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत. जुलाना विधानसभा मतदारसंघात विनेश फोगटच्या विरोधातील भाजपाचे उमेदवार योगेश कुमार हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात निकालाचं चित्र स्पष्ट होईल.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ची ४८ आणि भाजपाची २८ जागांवर आघाडी
Harayana Election Result 2024 Live : कुस्तीच्या आखाड्यातून थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या विनेश फोगाट सध्या दुसऱ्या फेरीनंतर पिछाडीवर आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघात विनेश फोगटच्या विरोधातील भाजपाचे उमेदवार योगेश कुमार हे आघाडीवर आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात निकालाचं चित्र स्पष्ट होईल.
Harayana Vidhan Sabha Election Result 2024 Live : : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. भाजपा ४६ तर काँग्रेसची ३७ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे हरियाणातील आकड्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्ष ६० पर्यंत गेला होता. मात्र, काँग्रेसचे आकडे आता खाली आले असून हरियाणात काँग्रेसमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ची ५२ आणि भाजपाची २२ जागांवर आघाडी
Harayana Vidhan Sabha Election Result 2024 Live : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार ९० जागांपैकी काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष ४५ जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात आकड्यांमध्ये मोठे बदल झाले असून काँग्रेस पक्ष ६० पर्यंत गेला होता. मात्र, काँग्रेसचे आकडे आता खाली आले असून हरियाणात भाजपा आणि काँग्रेसमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. पुढच्या काही थोड्याच वेळात निकाल हाती येणार आहे.
Harayana Election Result 2024 Live: हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार ९० जागांपैकी काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष ४४ जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही थोड्याच वेळात पहिला निकाल हाती येणार आहे.
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरसीची लढत पाहायला मिळाली होती. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. तर भारतीय जनता पक्षाने सत्तेची हॅटट्रीक करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, आता निवडणुकीच्या निकालात कोणत्या पक्षाला धक्का बसणार? आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे.