Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणाच्या राजकारणात मुरलेले मनोहर लाल खट्टर यांच्याऐवजी जेव्हा भाजपानं नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं, तेव्हा कुणालाच त्यांच्या प्रभावाची सुतराम कल्पना नव्हती. मुळात खट्टर यांच्या अनुभवासमोर सैनी यांचा अनुभव कमीच होता. त्यात त्यांचं व्यक्तिमत्वही खट्टर यांच्याप्रमाणे आक्रमक वाटत नसल्यामुळे भाजपानं आपला मोहरा निवडताना चूक तर केली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. हरियणा विधानसभा निवडणुकीसाठीचे एग्झिट पोल आल्यानंतर या चर्चेत खरंच तथ्य असल्याचंही बोललं जात होतं. पण हे सगळं खोटं ठरवत सैनी यांनी हरियाणात भाजपाचा विजय साकार केला.

हरियाणात गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्याचं दिसून आलं. सगळ्यात आधी शेतकरी आंदोलनामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व सरकारविरोधी भावना असल्याचं पाहायला मिळालं. त्याचा कडेलोट दिल्लीच्या सीमारेषेवर झाला. शेवटी मोदी सरकारला तीन शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले. त्यानंतर महिला कुस्तीपटूंनी तत्कालीन भाजपा खासदार व कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दंड थोपटले.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे भाजपासमोर आपली प्रतिमा राखण्याचं आव्हान निर्माण झालं. त्यातून बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईचीही मागणी झाली. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे हरियाणातील सरकारविरोधी वातावरण तीव्र होत असल्याचं बोललं जाऊ लागलं. याचा फटका भारतीय जनता पक्षाला येत्या निवडणुकांमध्ये बसण्याचे अदाज राजकीय अभ्यासकांकडून वर्तवले जाऊ लागले. एग्झिट पोल्सच्या अंदाजांनी ही शक्यता खरीच असल्याचं अधोरेखित केलं. पण मंगळवारी निकालाच्या दिवशी चित्र अगदी १८० अंशांमध्ये फिरलं आणि हरियाणात भाजपाचा विजय साकार झाला.

विरोधात इतके सारे मुद्दे असतानाही भाजपाला हरियाणात विजय मिळण्यामागचं एक सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे हरियाणाचे विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंग सैनी. गेल्या १० वर्षांत राज्यात निर्माण झालेल्या सरकारविरोधी वातावरणात भाजपाला एका नव्या चेहऱ्याची गरज होती. त्यातून खट्टर यांना हटवून नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यातून खट्टर विरुद्ध सैनी असा छुपा सामनाही हरियाणाच्या राजकारणात निर्माण झाल्याचं बोललं जाऊ लागलं. पण सैनी यांनी आपलं काम चोख बजावलं हे निकालांमधून स्पष्ट झालं.

लोकसभा निवडणूक निकाल भाजपाच्या बाजूने लागले असले, तरी अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे तो एकप्रकारे सत्ताधारी पक्षांसाठी धक्काच मानला गेला. हरियाणातही भाजपाच्या लोकसभेच्या जागा १० वरून पाचपर्यंत खाली आल्या. मात्र, विधानसभा निवडणूक निकालांमुळे भाजपाने हरियाणावर आपली पकड पुन्हा एकदा मजबूत केल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्तेत!

केंद्रातल्या सत्तेप्रमाणेच हरियाणातही जवळपास ६ दशकांनंतर कुठल्याही पक्षाला सलग तिसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळाली आहे. त्यासाठी प्रचारादरम्यान सैनी यांनी केलेल्या घोषणा आणि दिलेली आश्वासनं यांचा महत्त्वाचा वाटा होता, असं मानलं जात आहे. यामध्ये ओबीसी व अनुसूचित जातींपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता. जाट समुदाय शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे झुकल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सैनींचं हे धोरण भाजपासाठी महत्त्वाचं ठरलं.

Haryana Assembly Election Result 2024 : “…तर मी माझं नाव बदलेन”, खुलेआम दिलेलं आव्हान काँग्रेस प्रवक्त्याच्या अंगाशी येणार? हरियाणातील निकाल येताच सोशल मीडियावर ट्रोल!

या काळात सैनी यांनी भाजपाच्या नेहमीच्याच घोषणा केल्या असल्या, तरी त्यांचं स्वरूप त्यांनी हरियाणातील मुद्द्यांच्या आधारे ठेवलं होतं. त्यात ५० हजार सरकारी नोकऱ्या, गरिबी रेषेच्या खालील प्रत्येक कुटुंबाला १०० चौरस यार्डच्या जमिनींचं वाटप, हरियाणा अंत्योदय परिवार परिवहन योजना अर्थात HAPPY च्या माध्यमातून राज्यातील १ हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत आणि अनधिकृत निवासी संकुलांना मान्यता अशा आश्वासनांवर सैनी यांनी अधिक भर दिला.

यादरम्यान सैनी यांनी सरकारी नोकऱ्यांच्या मुद्द्यावर जास्त भर दिल्याचं पाहायला मिळालं. भाजपा सरकारनं या नोकऱ्या मेरिटच्या आधारावर दिल्या असून काँग्रेसनं आधीच्या काळात सरकारी नोकऱ्या भ्रष्ट मार्गाने दिल्याचा आरोप भाजपानं केला. तसेच, शेतकऱ्यांमधील असंतोषाचा मुद्दा भाजपासाठी महत्त्वाचा होता. त्यावर शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजनांचा सैनी यांनी प्रामुख्याने प्रचारादरम्यान आधार घेतला.

कोण आहेत नायब सिंग सैनी?

मूळचे अंबाला जिल्ह्यातल्या मिर्झापूर माजरा भागातले सैनी हे कायद्याचे पदवीधर आहेत. संघाचं काम करत असताना त्यांची मनोहर लाल खट्टर यांच्याशी भेट झाली व त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याचं बोललं जातं. २००९ साली त्यांनी नरेनगढ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यांचा काँग्रेसचे रामकिशन गुर्जर यांनी पराभव केला. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली व ते जिंकले. खट्टर यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. २०१९ मध्ये त्यांनी कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून ३ लाख ८३ हजार मतांच्या फरकाने विरोधी उमेदवाराचा पराभव केला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सैनी यांनी लाडवा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांच्या नारायणगढ मतदारसंघातून त्यांचे विश्वासू पवन सैनी यांना उमेदवारी देण्यात आली. लाडवा हा पवन सैनी यांचा मतदारसंघ होता. पण २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर या मतदारसंघातून नायब सिंग सैनी यांना उमेदवारी देण्यात आली होती.