Haryana JJP Loss : हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल लागले आहेत. हरियाणात भाजपाला बहुमत मिळालं आहे आणि तिसऱ्यांदा हरियाणात भाजपाची सत्ता आली आहे. तर जम्मू काश्मीरमद्ये नॅशन कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे. या दोन्ही निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी छोट्या पक्षांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
हरियाणातील जेजेपीची बिकट अवस्था
हरियाणातील जेजेपी ( Haryana JJP Loss ) म्हणजेच जननायक जनता पार्टीचं ( Haryana JJP Loss ) हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रचंड नुकसान झालं आहे. तसंच इंडियन नॅशनल लोकदलाचा किल्लाही या निवडणुकीत ढासळला आहे. माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीची धूळधाण उडाली आहे. या पक्षाला फक्त ०.९० टक्के मतं मिळाली आहेत. जेजेपीने चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीसह निवडणूक लढली होती. मात्र या दोन्ही पक्षांना एकही मत मिळालेलं नाही. जेजेपीने ९० पैकी ७० तर एएसपीने २० जागांवर निवडणूक लढवली होती. या दोन्ही लहान पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.
हे पण वाचा- हरियाणात काँग्रेस हरली, पण जागा वाढल्या; विधानसभेत विरोधी पक्षाचे भाजपासमोर तगडे आव्हान!
दुष्यंत चौटाला पराभूत
दुष्यंत चौटाला यांनी उचाना कलां या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. ते या ठिकाणी पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना फक्त ७ हजार मतं मिळाली. चौटाला हे ४१ हजारांनी पिछाडीवर पडले. जननायक जनता पार्टीने ( Haryana JJP Loss ) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी त्यांना खातंही उघडता आलं नाही. भाजपाने २०१९ मध्ये जेजेपीला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली होती. दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले होते. मात्र या निवडणुकीच्या आधी दोघांनी वेगळे मार्ग अवलंबले. अर्थात त्यात चौटालांच्या जेजेपी ( Haryana JJP Loss ) पक्षाचं नुकसान झालं आहे.
इंडियन नॅशनल दल या पक्षाचंही नुकसान
इंडियन नॅशनल दल या पक्षालाही मोठं नुकसान झालं. इंडियन नॅशनल लोकदल आणि बसपा यांनी बरोबर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या.इंडियन नॅशनल दल या पक्षाला दोन जागांवर जो विजय मिळाला तो देखील निसटता आहे. पहिली जागा डबवाली येथील आहे. या ठिकाणी आदित्य यांनी ६१० जागांच्या कमी फरकाने निवडणूक जिंकली आहे. तर दुसरी जागा आहे ती सिरसा येथील रानियाची. या ठिकाणी अर्जुन चौटाला यांनी काँग्रेसच्या सर्वमित्र यांचा ४१९१ मतांनी पराभव केला आहे. या दोन जागा सोडल्या तर इतर कुठल्याही जागेवर इंडियन नॅशनल दल या पक्षाला निवडणूक जिंकता आलेली नाही.